JOIN US
मराठी बातम्या / Viral / मगरीचं नशीब खराब की हरणाचं नशीब चांगलं? Viral Video पाहून तुम्हाला काय वाटतं?

मगरीचं नशीब खराब की हरणाचं नशीब चांगलं? Viral Video पाहून तुम्हाला काय वाटतं?

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. हा व्हिडीओ हरण आणि मगरीचा आहे. या व्हिडीओमध्ये जे घडतं ते तुम्ही श्वास रोखून पाहाल हे नक्की.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 29 नोव्हेंबर : सोशल मीडिया म्हटलं की पहिलं आपल्या डोळ्यांसमोर आठवतं, ते म्हणजे व्हिडीओ. कारण एकदा का आपण सोशल मीडिया ओपण केलं तर आपल्यासमोर येतात ते व्हिडीओच. हे व्हिडीओ वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ज्यामध्ये वाईल्ड लाईफ, कॉमेडी, लग्नसमारंभ, फूड, ट्रॅव्हल आणि क्राफ्ट यांसारखे व्हिडीओ असतात. लोक आपल्या आवडीनुसार ते पाहात असतात. जगात प्राणी प्रेमींची देखील कमी नाही, त्यामुळे बराचसा असा वर्ग आहे, ज्यांना प्राण्यांशी संबंधीत व्हिडीओ पाहाणे देखील आवडते. त्यात वाईल्ड लाइफ संबंधी, म्हणजेच शिकारीचे व्हिडीओ पाहाणे अनेकांना आवडते. हे ही पाहा : अजगराचा हरणारा विळखा, खेळ खल्लास होणार इतक्यात… थरारक घटनेचा Video Viral सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. हा व्हिडीओ हरण आणि मगरीचा आहे. या व्हिडीओमध्ये जे घडतं ते तुम्ही श्वास रोखून पाहाल हे नक्की.

खरंतर नदी काठी एक हरण पाणी पिण्यासाठी आलं असतं, हे हरण पाणी पिताना अगदी अलगद आणि सावधगिरी दाखवून पाणी पित आहे. पण तेव्हाच डोळ्यांची पापाण लवते न लवते तोच मगरीची एन्ट्री होते आणि ती थेट हरणावर अटॅक करते. पण असं असलं तरी हरण इतकं सावध असतं की ते देखील क्षणाचा ही विलंब न करता मागे हटते, ज्यामुळे त्याचे या हल्ल्यामध्ये प्राण वाचले आहे.

कदाचित पहिल्याच वेळेत नक्की काय घडलंय हे तुम्हाला कळणारच नाही, यासाठी तुम्ही हा व्हिडीओ दोनदा पाहाल, ज्यामुळे तुम्हाला कळेल की नक्की काय घडलंय. खरंतर हरण सावध असल्यामुळे त्याचे प्राण वाचले आहे. नाहीतर त्याचं काही खरं नव्हतं. हा व्हिडीओ सोशल मीडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरुन शेअर केला जात आहे. लोकांनी यावर वेगवेगळ्या कमेंट्स देखील केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या