म्हशींचा सिंहावर भयानक हल्ला.
मुंबई, 17 ऑक्टोबर : सिंह म्हणजे जंगलाचा राजा. ज्याला जंगलातील कित्येक प्राणी घाबरतात. सिंहाला तुम्ही शिकार करतानाही पाहिले असेल. सिंहाच्या शिकारीचे असे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण तुम्ही सिंहाची शिकार होताना कधी पाहिलं आहे का? असाच धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. म्हशींनी सिंहाला भयानक मृत्यू दिला आहे. जंगलातील म्हशींनी सिंहाच्या पिल्लावर भयानक हल्ला केला आहे. शिंगांनी त्याला फुटबॉलसारखं हवेत उडवत त्याचा जीव घेतला आहे. हा व्हिडीओ पाहूनच हैराण व्हाल. सिंहाची अशी अवस्था पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. शिकार करणाऱ्या सिंहाचा सर्व राग म्हशी या सिंहाच्या पिल्लावर काढत आहेत, असंच या व्हिडीओतून दिसून येतं. हे वाचा - छोटं पिल्लू समजून सिंहाच्या छाव्याला गोंजारायला गेला तरुण; पुढे जे घडलं ते धक्कादायक; पाहा VIDEO व्हिडीओत तुम्ही पाहाल सुरुवातीला म्हशींचा कळप दिसत आहे. इतक्या या कळपातून एक प्राणी अचानक हवेत उडताना दिसतो. हा प्राणी दुसरा तिसरा कुणी नाही तर सिंह आहे. सिंहाचं पिल्लू आहे. म्हशी त्या पिल्लाला एकएक करत हवेत उडवत आहेत. कधी पिल्लू इकडे, तर कधी तिकडे. सिंह असो वा त्याचं पिल्लू, त्याला असं आपण कधीच पाहिलं नाही आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. पिल्लाची अशी अवस्था पाहवत नाही आहे. हे वाचा - सिंहीणीच्या तावडीत अडकला, पण मृत्यूला चकमा देऊन परतला… पाहा Viral Video earth.reel इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्यातच कमेंट येत आहेत. बहुतेक युझर्सनी हेच आयुष्याचं, निसर्गाचं चक्र आहे, यालाच कर्म म्हणतात, जंगलात जगण्यासाठी असा संघर्ष करावा लागतो, असं म्हटलं आहे. तर काहींनी छोट्याशा सिंहाला असं मृत्यूच्या दारात जाताना पाहून वाईट वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
सिंहासारख्या प्राण्यावरही इतर प्राणी भारी पडू शकतात, एकीचं बळ काय असतं, हेसुद्धा या व्हिडीओतून दिसून येतं आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.