आग्रा, 21 सप्टेंबर : आग्रातील एका हॉटेलमध्ये नवरा-बायकोचा हायवोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. बायकोने आपल्या नवऱ्याला हॉटेलमध्ये रोमान्स करताना रंगेदाथ पकडलं. नवरा आपल्या गर्लफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये होता. तेव्हा बायको तिथं पोहोचली. त्यानंतर तिने नवरा आणि त्याच्या गर्लफ्रेंडला चांगलीच अद्दल घडवली. दोघांचीही तिने धुलाई केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. माहितीनुसार ही घटना हरी पर्वत परिसरातील एका हॉटेलमध्ये झाला आहे. एक व्यक्ती आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन या हॉटेलमध्ये आला होता. त्याची माहिती तिला मिळाली आणि तीसुद्धा हॉटेलमध्ये आली. आपल्या भावासोबत ती या हॉटेलमध्ये गेली आणि तिथं तिने राडा घातला. दोघांचीही चपलेने धुलाई केली आहे. कित्येक तास तिने दोघांना चोप चोप चोपून काढलं. हे वाचा - एकट्या तरुणासोबत तरुणींनी मिळून केला भयंकर प्रकार; VIDEO पाहून नेटिझन्सचा संताप माहितीनुसार महिलेच्या लग्नाला बरीच वर्षे झाली आहे. तिचा नवरा एका नर्सिंग होममध्ये काम करतो. दोघांनाही १६ वर्षांची मुलगी आहे. नवऱ्याच्या वागणुकीला ती वैतागली होती. त्यामुळे माहेरी राहत होती. पण नवऱ्यावर तिचं लक्ष होतं. तेव्हाच तिला याची माहिती मिळाली आणि तिने भावासोबत हे हॉटेल गाठलं.
व्हिडीओत पाहू शकता ती कशापद्धतीने दोघांनाही चपलेने मारताना दिसते आहे. नवरा हात जोडून तची माफी मागते आहे. पण ती काही ऐकत नाही. नंतर फोन करून नवऱ्याच्या गर्लफ्रेंडच्या नवऱ्यालाही बोलावते. हे वाचा - महिलेची छेड काढणं या व्यक्तीला पडलं महागात; अखेर 20 सेकंदात खाव्या लागल्या 40 चपलांचा मार, पाहा Video रात्री उशिरापर्यंत हा राडा सुरू होतो. ज्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.