JOIN US
मराठी बातम्या / Viral / Oh no! मोबाईल पाहताच उंटाला आला राग; सेल्फी काढणाऱ्या महिलेसोबत काय केलं पाहा VIDEO

Oh no! मोबाईल पाहताच उंटाला आला राग; सेल्फी काढणाऱ्या महिलेसोबत काय केलं पाहा VIDEO

उंटाने महिलेसोबत असं काही केलं की पाहूनही तुम्हाला विश्वास बसणार नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 मार्च : आपण कुठे फिरायला गेलो की सेल्फी काढण्याचा मोह आपल्याला आवरत नाही. एखादं सुंदर ठिकाण, क्वचितच किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणीच दिसणारा प्राणी समोर आला की मग मोबाईल हातात घेऊन त्याला आपल्या कॅमेऱ्यात टिपणं किंवा त्याच्यासोबत सेल्फी घेणं येतंच. अशाच एका महिलेने एका उंटासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. पण हा सेल्फी तिला चांगलाच महागात पडला (Woman take selfie with camel). उंट पाळीव आणि शांत प्राणी. उंट माणसांना हानी पोहोचवू शकतो, याचा आपण विचारही करू शकत नाही. पण एका महिलेसोबत उंटाने जे केलं त्यावर तुमचा विश्वासही बसणार नाही. व्हिडीओत पाहू शकता एक महिला सुरुवातीला हातात मोबाईल घेऊन दिसते. एका उंटासमोर जाऊन ती उभी राहते. उंट आणि तिच्यामध्ये एक संरक्षक जाळं आहे. शिवाय उंट तसे माणसांना हानी न पोहोचवणारे प्राणी. त्यामुळे ही महिला बिनधास्तपणे उंटासमोर जाते आणि मोबाईल हातात घेऊन सेल्फी काढताना दिसते. हे वाचा -  VIDEO - पाणघोड्याने जबड्यात धरून जमिनीवर आपट आपट आपटलं आणि…; सिंहाची कधीच पाहिली नसेल इतकी भयानक अवस्था सुरुवातीला उंटही शांत असतो. पण जशी महिला सेल्फी घेण्यासाठी पोझ देते, तसा उंट तिच्यावर हल्ला करतो. तिचं डोकं आपल्या तोंडात घेतो. महिलाही घाबरतो आणि मोठ्याने किंचाळत खाली वाकते.

संबंधित बातम्या

afvofficial नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून बऱ्याच कमेंट येत आहेत हा सेल्फी खतरनाक आहे, ही प्रेमाची झप्पी आहे, अशा फनी कमेंट येत आहेत. तर एका युझरने उंटाला या महिलेची हरकती पाहून राग आला असावा असं दिसतं आहे आणि म्हणूनच त्याने हल्ला केला असं म्हटलं आहे. हे वाचा -  VIDEO - म्हशीने खेचत पाण्यातून बाहेर आणलं आणि…; मगरीवर उलटा पडला शिकारीचा डाव तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या