JOIN US
मराठी बातम्या / Viral / बापरे! नाचता नाचता फाटली 'धरती' आणि जमिनीत सामावले लोक; लग्नातील भयंकर दुर्घटनेचा VIDEO

बापरे! नाचता नाचता फाटली 'धरती' आणि जमिनीत सामावले लोक; लग्नातील भयंकर दुर्घटनेचा VIDEO

लग्नात नाचणाऱ्या लोकांसोबत घडली भयंकर दुर्घटना.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 जून : लग्न म्हटलं की मजा-मस्ती डान्स आलाच. लग्नातील डान्सचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण सध्या असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो तुम्ही याआधी कदाचित कधीच पाहिला नसावा (Shocking video viral). लग्नात लोक नाचत असताना अशी भयंकर दुर्घटना घडली आहे, की तुमचाही श्वास काही क्षणापुरता थांबेल. काळजाचा ठोका चुकवणारा असा हा व्हिडीओ आहे (Accident during wedding dance). व्हिडीओत पाहू शकता बरेच लोक एकत्र नाचताना दिसत आहेत. ते असे नाचतात नाचतात की खाली धरतीच फाटते आणि नाचणारे सर्वच्या सर्व लोक एकाच वेळीच जमिनीत सामावतात. सुरुवातीला नेमकं काय घडलं ते कुणालाच समजलं नाही. सर्वजण घाबरले. या सर्वांसोबत डान्स करणारे आणखी एक दोन बचावतात आणि ते जमिनीवर आडवं पडून त्यांच्यासाठी पटकन मदतीचा हात पुढे करताना दिसतात. हे वाचा -  लग्नाच्या आनंदात भररस्त्यातच तरुणाचं संतापजनक कृत्य; VIDEO पाहून भडकले नेटिझन्स दुर्घटना तशी भयंकर आहे, पण सुदैवाने कुणाला काही गंभीर दुखापत झाल्याचं दिसत नाही आहे. व्हिडीओ पाहून सुरुवातीला आपल्यालाही धडकी भरते पण शेवटी हसूही आवरत नाही. कारण धरती प्रत्यक्षात फाटली नाही आहे. तर जिथं हे लोक डान्स करत आहेत, तिथं लाकडाची फ्लोअरिंग आहे. ही फ्लोरिंग अचानक तुटते. जितक्या भागावर लोक नाचत होते, तितकाच भाग तुटतो आणि कोसळतो. त्यासोबत त्यावर असणारे सर्वच्या सर्व लोक एकाच वेळी खाली कोसळतात.

संबंधित बातम्या

इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर “भावा तुझ्या लग्नात  ‘धरती फाड़’ डान्स करणार”, असंही म्हटलं आङे. व्हिडीओवर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत. या व्हिडीओबाबत तुमची कमेंट आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या