JOIN US
मराठी बातम्या / Viral / 10 रुपयांच्या नोटेवरील हटके Love Story Viral! GF Kusum च्या मेसेजवर BF Vishal चा भन्नाट रिप्लाय

10 रुपयांच्या नोटेवरील हटके Love Story Viral! GF Kusum च्या मेसेजवर BF Vishal चा भन्नाट रिप्लाय

10 रुपयांच्या नोटवर कुसुमने विशालसाठी दिलेल्या मेसेजवर त्याचा रिप्लाय आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 एप्रिल : काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक 10 रुपयांची नोट चर्चेत आली होती. ज्यावर एका गर्लफ्रेंडने आपल्या बॉयफ्रेंडसाठी मेसेज दिला होता (Boyfriend girlfriend story). या गर्लफ्रेंडच्या या मेसेजला बॉयफ्रेंडने रिप्लाय दिला आहे. तोसुद्धा 10 रुपयांच्या नोटेवरच. आता बॉयफ्रेंडची ही नोट व्हायरल होते आहे. विशाल आणि कुसुम यांची 10 रुपयांच्या नोटेवरील ही लव्ह स्टोरी जबरदस्त चर्चेत आहे (Vishal reply to Kusum on Rs 10 note love story). कुसुम नावाच्या एका तरुणीने विशाल नावाच्या आपल्या बॉयफ्रेंडसाठी 10 रुपयांच्या नोटेवर मेसेज लिहिला होता. आपलं लग्न ठरलं असून मला पळवून घेऊन जा असा हा मेसेज होता. नोटेवर 26 एप्रिलला लग्न असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर ही नोट तुफान व्हायरल झाली. कुसुमची ही मेसेजवाली नोट सोशल मीडियामार्फत विशालपर्यंत पोहोचवण्याची नेटिझन्सची धडपड सुरू झाली. अखेर कुसुमच्या लग्नाआधी विशालचा त्या मेसेजवर रिप्लाय आला आहे. विशालच्या नावाने कुसुमसाठी पाठवण्यात आलेल्या या 10 रुपयांच्या नोटेवर म्हटलं आहे, “कुसुम मला तुझा मेसेज मिळाला आहे. मी तुला घ्यायला येणार. आय लव्ह यू. तुझा विशाल” हे वाचा -  OMG! ‘सुपर से भी ऊपर’ आजीबाई; वयाच्या 99 व्या वर्षी इंजिनशिवाय उडवलं Plane; पाहा जबरदस्त Video 26 एप्रलिला कुसुमचं लग्न आहे आणि त्याआधी विशालचा रिप्लाय आला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. ही प्रेमकहाणी कितपत खरी आहे माहिती नाही. 10 रुपयांच्या नोटेवर मेसेज लिहिणारे हे  कुसुम आणि विशाल प्रत्यक्षात आहेत का?  ही फक्त मजा म्हणून ही नोट व्हायरल होते आहे? या व्हायरल नोटेमागे यामागे आणखी काही वेगळा ट्विस्ट पाहायला मिळणार? असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत. त्यामुळे आता सर्वांना 26 एप्रिलची प्रतीक्षा आहे.

संबंधित बातम्या

जर ही लव्हस्टोरी खरी असेल तर हे कपल एकमेकांना भेटणार का? आणि भेटले तर विशाल आपल्या कुसुमला पळवून नेण्यात यशस्वी होणार का? हे आता आपल्याला 26 एप्रिललाच कदाचित समजेल. हे वाचा -  हे कसं शक्य आहे? Lemon सोबत व्यक्तीने असं काही केलं की Video पाहून सर्वजण चक्रावले @AJAYYAD46374764 ट्विटर अकाऊंटवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. नेटिझन्स यावर आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. तुम्हाला नेमकं या हटके लव्हस्टोरीबाबत काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या