JOIN US
मराठी बातम्या / Viral / Watch Video : मोबाईल चोरून पळाला चोर, पण दुसऱ्याच क्षणी घडलं असं काही की मिळालं 'कर्माचं फळ'

Watch Video : मोबाईल चोरून पळाला चोर, पण दुसऱ्याच क्षणी घडलं असं काही की मिळालं 'कर्माचं फळ'

तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच उभा राहिला असणार की नक्की काय घडलं?

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 6 नोव्हेंबर : सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ आपल्या समोर येईल, याचा काही नेम नाही. येथे आपल्या कधी लग्नाशी संबंधीत तर कधी कॉमेडी व्हिडीओ देखील पाहायला मिळतात. हे व्हिडीओ फारच मनोरंजक असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खरंतर हा एका चोरीचा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये एक चोर चोरी करण्याचा प्रयत्न करतो. परंतू त्याचा प्लान पूर्ण फसतो आणि त्याच्या कर्माचं फळ त्यांना लगेच मिळतं. आता असं म्हटल्यानंतर तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच उभा राहिला असणार की नक्की काय घडलं? हा व्हायरल व्हिडीओ परदेशातील असल्याचे समोर आले आहे. यामध्ये चोरट्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या व्यक्तीचा मोबाईल हिसकावून पळ काढल्याचे दिसत आहे. पण दुसऱ्याच क्षणी त्याला ‘कर्माचे फळ’ मिळाले. हे ही पाहा : रेस्टॉरंटमध्ये TIP का देतात, याची सुरूवात केव्हा पासून झाली? त्याचे असे झाले की, तो चोक चोरी करुन पळून जातो, परंतू तेवढ्यात भरधाव वेगाने एक गाडी येते आणि त्या चोराला जोरदार धडकते.

संबंधित बातम्या

या धडकेमुळे हा चोर जखमी झाला आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्याची परिस्थीती फारच गंभीर असल्याचे दिसत आहे. तसे पाहाता या चोरानी जी चुकी केली ती, त्याच्या जिवावर बेतली आहे. तो एकवेळ पकला गेला असता, तर त्याला काही महिने किंवा वर्ष तुरुंगाची हवा खावी लागली असती, पण त्याचे प्राण तरी वाचले असते. आता हा चोर आपल्या जीवन मरणाची लढाई करत आहे.

हा व्हिडीओ नक्की कुठला आहे, हे कळू शकलेलं नाही. हा व्हिडीओ Vicious Videos नवाच्या अकाउंटवरुन सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या