JOIN US
मराठी बातम्या / Viral / हा VIDEO एकदा पाहाच, जिममध्ये दोन महिला अशा काही जुंपल्या की.... यामागचं कारण पाहून बसेल धक्का

हा VIDEO एकदा पाहाच, जिममध्ये दोन महिला अशा काही जुंपल्या की.... यामागचं कारण पाहून बसेल धक्का

खरंतर हा व्हिडीओ कोणी भारतीयांच्या भांडणाचा नाही तर परदेशातील महिलांच्या भांडणाचा आहे, पण असे असले तरी देखील, भांडण कोणाला पाहायला आवडत नाहीत?

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 12 ऑक्टोबर : लोकांचा आज-काल जिममध्ये जाण्याचा ट्रेंड खूपच वाढला आहे. आधी फक्त पुरुषांमध्ये ही क्रेज जास्त होती. पण आता मुली देखील जिममध्ये जाऊ लागल्या आहेत. जिममध्ये शक्यतो लोक आपलं फिजिक्स बनवायला जातात. परंतू एका जिममध्ये काही वेगळंच पाहायला मिळालं आहे. खरंतर जिममध्ये महिला भांडताना दिसल्या. हे भांडण सादं नव्हतं तर चक्कं मारामारी पर्यंत प्रकरण पोहोचलं होतं. हल्लीच ट्रेनमध्ये महिलांची भांडणं आणि मारामारीचा व्हिडीओ आपल्या समोर आला होता. त्यात आता हा जिममधील व्हिडीओ देखील सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे. खरंतर हा व्हिडीओ कोणी भारतीयांच्या भांडणाचा नाही तर परदेशातील महिलांच्या भांडणाचा आहे, पण असे असले तरी देखील, भांडण कोणाला पाहायला आवडत नाहीत? हे ही पाहा : नव्या कोऱ्या कारची ग्रँड एन्ट्री, Video पाहून तुम्हाल हसावं की मालकासाठी दु:खं व्यक्त करावं हेच कळणार नाही भारतीय लोकांसाठी भांडण आणि मारामारी तसं फारसं वेगळं नाही. परंतू तरी देखील लोकांना दुसऱ्यांच्या भांडणात नक्कीच मज्जा येते. त्यात हे परदेशी महिलांचं भांडण… मग तर लोक त्याला आवर्जून पाहातात. हे भांडण सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालं आहे, जे इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन महिला किरकोळ कारणावरून भांडल्या होत्या.

संबंधित बातम्या

संपूर्ण व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की, जीममध्ये महिलांमधील भांडणाचे कारण काय होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दोन महिलांमध्ये जिमच्या उपकरणावरून भांडण करु लागल्या. हे ही पाहा : स्कूटी वाल्याचा असा झोल, नियम मोडून देखील गाडीचं चलान कधी आलंच नाही… वास्तविक, एक महिला बराच वेळ जिममध्ये व्यायाम करत होती, तिच्या डाव्या बाजूला दुसरी महिला ते उपकरण रिकामी होण्याची वाट पाहत होती. जेव्हा ती महिला तेथून निघाली, तेव्हा दुसरी महिला व्यायामासाठी पुढे जातच होती की, अचानक मागून तिसरी महिला येते आणि तिला धक्काबुक्की करते. ज्यानंतर दोन्ही महिलांमध्ये जुंपते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने गंमतीत म्हटले की, ‘बऱ्याच कॅलरीज बर्न झाल्या होत्या.’ दुसऱ्याने लिहिले, ‘मजबूत केसांसाठी उत्तम कसरत.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या