मुंबई, 30 एप्रिल : आपल्याला नुसतं एखादी माशी चावली तर किती दुखतं. पण एका कोळ्यानं कानात घुसून जाळं विणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. डेली स्टारनं दिलेल्या वृत्तानुसार चीनमध्ये एका वृद्ध महिलेच्या कानात हा कोळी जाळं विणत असल्याचं समोर आलं आहे. हे पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. या वृद्ध महिलेच्या कानाचा सर्जरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा कोळी एक आठवडा या महिलेच्या कानात होता आणि त्यानं कानात जाळ तयार केलं होतं.
चीनमधील सिचुआन भागात रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. 22 एप्रिल रोजी कान दुखत असल्यानं आणि खाज येत असल्याची तक्रार घेऊन ही महिला डॉक्टरांकडे आली. कानातून आवाज येत असल्याचंही या महिलेनं डॉक्टरांना सांगितलं. लाडीबेलच्या वृत्तानुसार, डॉक्टरांनी त्या महिलेच्या कानात तपासणी केली. कानात एक जिवंत कोळी असल्याचं लक्षात आलं. डॉक्टरांनी केमिकलचे थेंब कानात काढून चिमट्यानं कोळ्याला बाहेर काढलं. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोळी छोटा होता आणि इयरड्रमला या कोळ्यानं कोणतीही इजा पोहोचवली नाही. नाहीतर या महिलेला ऐकण्याची समस्या निर्माण झाली असती. पण सुदैवानं असं काही झालं नाही. त्यामुळे महिलेचा कान नीट आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. हे वाचा- कोलांटी उडी मारणारा हत्ती कधी पाहिलाय का? सोशल मीडियावर VIDEO व्हायरल हे वाचा- लॉकडाऊनमुळे गंगा इतकी स्वच्छ झाली की दिसले डॉल्फिन? वाचा VIRAL VIDEO मागचं सत्य संपादन- क्रांती कानेटकर