इस्लामाबाद, 29 मार्च : पाकिस्तानमध्ये एका महिलेसोबत लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकऱणाचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे. या व्हिडीओमध्ये महिला अधीक्षकाच्या कार्यालयात कामानिमित्तानं आली होती. तिचं काम संपल्यानंतर तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हा अधीक्षक उठून महिलेला जबरदस्ती मिठी मारत असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे. महिलेसोबत गैरवर्तन करणाऱ्या या अधीक्षकाविरोधात कारवाई करण्यात आली आहे. हा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
हे वाचा- संकटकाळात महाराष्ट्रवासीयांची एकजूट, डोंबिवलीच्या मदतीला धावले नाशिककर डॉ.फयाज खोखर असं या गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. ते कामुंकीच्या टीएचक्यू हॉस्पिटलमध्ये एमएस पदावर तैनात होते. मात्र, ही घटना उघडकीस आल्यानंतर त्यांना पदावरून काढून टाकण्यात आले आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल, कारवाईची मागणी सदाफ यासिर खान नावाच्या ट्विटर युझरनं हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचबरोबर त्यांनी याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र, त्यांनी हा व्हिडिओ शेअर करताच त्याला गुजरानवालाचे उपायुक्त यांच्या ट्विटर हँडलवरून प्रतिसाद मिळाला आणि या व्यक्तीविरूद्ध आधीच कारवाई केली असल्याचे सांगण्यात आलं आहे. हे वाचा- मन की बात : लॉकडाऊनवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली माफी