मुंबई 2 सप्टेंबर : सोशल मीडियावर आपल्याला प्राण्यांसंबंधी अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. ज्यांमध्ये साप, वाघ, सिंह, मगर सारखे प्राणी असतात. या प्राण्यांचे व्हिडीओ हे असे काही व्हिडीओ असतात. जे आपल्या हृदयाचा ठोका चुकवतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो सापाचा आहे. परंतू हा कोणता साधा साप नाही तर तो कोब्रा साप आहे. किंग कोब्रा हा इतका खरतनाक असतो की त्याचा दंश होताच व्यक्ती मरतो. कारण तो इतर सापांपेक्षाही खूपच विषारी आहे. ज्यामुळे त्याच्यापासून लांबच राहिलेलं बरं. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण किंग कोब्रा सोबत खेळत आहे. तो आधी एका पिशवीतून सापाला बाहेर काढतो आणि मग त्याच्या शेपटीला पकडून त्याच्यासोबत खेळू लागतो आणि या सापाबद्दल माहिती सांगू लागतो. त्यानंतर हा तरुण सापाला मधून पुन्हा उचलतो आणि तो लोकांना असं न करण्यासाठी देखील सांगतो. हे दृश्य पाहातानाच आपल्याला इतकं भयानक वाटत आहे. परंतू या तरुणाला याचं काहीही नाही, तो अगदी आरामात या सापासोबत खेळत असतो. हे वाचा : ही तर ‘स्पायडर गर्ल’, Viral Video पाहून अनेकांना फुटला घाम अखेर हा तरुण सापाला खाली ठेवतो आणि मग त्याच्या अवतीभवती फिरु लागतो, ज्यानंतर हा किंग कोब्रा या तरुणाला टार्गेट करतो आणि तो जसा-जसा फिरतोय तसा फिरु लागतो. तो ही अगदी अटॅकिंग पोजिशनमध्ये असतो. हे पाहून आपल्यालाच धडकी भरेल.
पुढे जेव्हा हा तरुण त्या सापाला सोडून देण्याचा विचार करतो, तेव्हा हा साप असा काही माग वळतो की, एका सेकंदात या तरुणाचा खेळ खल्लास होणार असतो. परंतू तेवढ्याच चलाखीने हा तरुण मागे होतो, ज्यामुळे त्याचे प्राण वाचतात. हा किंग कोब्रा पुन्हा एकदा अटॅक करण्याचा प्रयत्न करतो आणि नशीबानं दुसऱ्या वेळी देखील हा तरुण वाचतो. हे वाचा : क्षणात उलटला शिकारीचा डाव! शिकार करायला आलेल्या वाघालाच बैलाने…; WATCH VIDEO हा व्हिडीओ ओडीसाचा असल्याचे सांगितले जात आहे. जो युट्यूबवर Murliwale Hausla नावाच्या अकाउंटवरुन अपलोड करण्यात आला आहे. ज्यावर लोकांना या व्हिडीओ लाईक आणि कमेंट केले आहेत.