JOIN US
मराठी बातम्या / Viral / कॅमेरामनच्या कृतीने मगरीला आला राग, पाण्यातून उडी मारली आणि... पाहा व्हिडीओ

कॅमेरामनच्या कृतीने मगरीला आला राग, पाण्यातून उडी मारली आणि... पाहा व्हिडीओ

जेव्हा एका कॅमेरामॅनने एका मगरीला आपल्या ड्रोन कॅमेरात कैद करण्याचा प्रयत्न केला…

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 23 डिसेंबर : फोटोग्राफर आपल्या मनासारखा शॉर्ट किंवा फोटो घेण्यासाठी काहीही करण्याची तयारी दाखवतो. त्यात वाईल्ड लाईफ फोटोग्राफर म्हटलं तर यासाठी फोटोग्राफरकडे खूप जास्त पेशन्स असण्याची गरज असते. तर आणि तरच त्यांना चांगले शॉट्स मिळू शकतात. आता थोडी टेक्नोलॉजी बदलली आहे. त्यामुळे आता ड्रोनच्या सह्याने फोटो किंवा व्हिडीओ घेतले जातात. पण जेव्हा एका कॅमेरामॅनने एका मगरीला आपल्या ड्रोन कॅमेरात कैद करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्यासोबत काही विचित्रच घडले. हे ही पाहा : लसीकरण करताना बाळाला असं फसवलं… व्हिडीओ पाहून थांबनार नाही हसू खरंतर मगरीना शुट करताना मगरीने एखादं पाखरु किंवा पक्षी समजून उडी मारली आणि ड्रोनवर हल्ला केला.

संबंधित बातम्या

व्हिडीओमध्ये एक ड्रोन पाण्याच्या अगदी जवळ उडताना दिसत आहे कारण मगरी आजूबाजूला त्याचा पाठलाग करताना दिसत आहे. ड्रोनच्या आवाजाने मगरीला त्रास झाला असावा. ड्रोन इकडे तिकडे घिरट्या घालत असताना मगरीने अचानक हवेत उडी मारून ड्रोन तोंडात दाबला.

हा व्हिडीओ हाऊ थिंग्ज वर्क नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला, जो 10 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि 6000 हून अधिक वेळा रिट्विट करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या