शिलाँग, 19 जून : गेल्या आठवड्यापासून पूर्वेकडील (Meghalay News) राज्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात तर विक्रमी पाऊस झाला आहे. मेघालयातील मावसिनराम (record rain in Meghalaya’s Mawsynram) येथे जगातील सर्वाधिक पाऊस पडतो. तेथील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तेथील एका धबधब्याचा आहे. व्हिडीओ पाहताना तुम्हाला ढग खाली आल्याचा भास होईल. मात्र हे ढग नसून धबधबा आहे. तेथे गेलेल्या एका पर्यटकानेच हा व्हिडीओ शूट केला आहे. धबधब्याचा प्रवाह इतका जोरात आहे की, तेथून गाडी जाणंही अवघड झालं आहे. पर्यटकांनाही हे ढग आहेत की, काय असं वाटत होतं. मात्र वाऱ्याच्या (Heavy rainfall) वेगाने धबधब्यातील प्रचंड वेगाने उडताना दिसत आहे. काही अहवालांनुसार, गेल्या 81 वर्षांत मावसिनराममध्ये 24 तासांच्या कालावधीत नोंदलेला हा सर्वाधिक पाऊस आहे. गेल्या तीन दिवसांत आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार पावसामुळे 39 लोकांचा मृत्यू झाला आहे, असे हिंदुस्तान टाईम्सने वृत्त दिले आहे.
या पावसाळ्यात एकूण 91 जणांचा मृत्यू झाला आहे आसाममधील पुरामुळे 26 लाख लोक प्रभावित झाले आहेत. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांचे मेघालय समकक्ष कॉनरॅड संगमा यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. पुढील दोन दिवस या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे.