JOIN US
मराठी बातम्या / Viral / तरुणीने अशी काही स्कूटी चालवली की थेट हवेतच उडाली... Video पाहून थांबणार नाही हसू

तरुणीने अशी काही स्कूटी चालवली की थेट हवेतच उडाली... Video पाहून थांबणार नाही हसू

सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ एका तरुणीचा आहे. ज्यामध्ये ती असं काही करते की ते पाहून तुम्हाला तिला ‘पापा की परी’ म्हणावंसंच वाटेल.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 4 डिसेंबर : सोशल मीडिया वर एकापेक्षा एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हे इतके मस्त असतात की ते लोकांच्या मनात घर करुन जातात. म्हणून असे व्हिडीओ खूपच प्रसिद्ध होत असतात. शिवाय येथे अपघातांशी संबंधीत देखील काही व्हिडीओ पाहायला मिळातात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ एका तरुणीचा आहे. ज्यामध्ये ती असं काही करते की ते पाहून तुम्हाला तिला ‘पापा की परी’ म्हणावंसंच वाटेल. खरंतर मुली बऱ्याचदा गाडी चालवताना अशा काही गोष्टी करतात की ज्यामुळे कधी त्यांचं स्वत:चं, तर कधी दुसऱ्याचं नुकसान करुन बसतात, अशाच मुलींना नेटकरी ‘पापा की परी’ म्हणतात. पण याचा अर्थ असा नाही की फक्त मुलीच अशा चुका करतात. असे अनेक मुलं देखील आहे. जे कधी कधी गाडी चालवताना काही चुका करताना दिसतात. हे ही पाहा : पेट्रोल भरताना तरुणाकडून अशी चुक, Video पाहून तुम्हाला ही बसेल धक्का या व्हायरल व्हिडीओमध्ये ही तरुणी अशी काही स्कूटी चालवते की ती थेट समोरील गेटला जाऊन धडकते. ही धडक एवढी जोरात असते की ही तरुणी वर उडते. काहीही तांत्रिक बिघाड नसताना किंवा कसलीही घाई नसताना देखील, फक्त गाडी टर्न घेतावना या तरुणीने मुर्खपणा करत गाडीला रेस जास्त दिला, ज्यामुळे तिचा गाडीवरी ताबा सुटला आणि थेट धडकली. तरुणीने इथे ब्रेक मारला असता तर कदाचित असं झालं नसतं.

संबंधित बातम्या

पण तिची गाडी गेटला धडकली, ज्यामुळे गेटचं तर नुकसान झालं. शिवाय तिच्या गाडीचं नुकसान झालं आणि तिला स्वत:ला देखील दुखापत झाली आहे.

हा व्हिडीओ जवळील एका व्यक्तीने कॅमेरात कैद केला आहे. हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला भरभरुन व्ह्यूज मिळाले आहेत. लोक या व्हिडीओला कमेंट करण्यापासून देखीस स्वत:ला थांबवू शकत नाहीत. हा व्हिडीओ अनेक युजर्सने वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर देखील शेअर केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या