JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIRAL VIDEO : गोष्टीतील टोपीवाल्यापर्यंत ठीक आहे, पण खऱ्या आयुष्यात माकडाने पळवली पोलिसाची टोपी, मग काय झालं आपण विचारसुद्धा करू शकत नाही

VIRAL VIDEO : गोष्टीतील टोपीवाल्यापर्यंत ठीक आहे, पण खऱ्या आयुष्यात माकडाने पळवली पोलिसाची टोपी, मग काय झालं आपण विचारसुद्धा करू शकत नाही

हा व्हिडीओ एका माकडाचा आहे, परंतु यामध्ये त्याने जे काही केलं, ते पाहून नेटकऱ्यांना ‘टोपीवाला आणि माकडं’ या गोष्टीची आठवण आली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ 23 ऑगस्ट : सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यांपैकी काही व्हिडीओ हे खूपच मनोरंजक असतात तर काही व्हिडीओ हे उदाहरण म्हणून आपल्यासमोर येतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो तुम्हाला तुमच्या लहानपणाची आठवण करुन देईल, तसेच तो व्हिडीओ पाहून तुम्हाला तुमचं हसू देखील आवरणार नाही. आपल्याल तर हे माहित आहे की, माकडं ही फारच हुशार असतात आणि ते जिथे जातात तेथे ते धुडगुस घालत असतात. त्यात अन्नाची नासाडी करणे, वस्तु उचलणे किंवा पळवूण नेणे हे त्यांचं आवडत काम. तुम्हाला लहानपणीची टोपीवाल्याची गोष्ट तर आठवतच असेल, ज्यामध्ये टोपीवाला झाडाखाली झोपला असताना माकडं त्याच्या टोप्या घेऊन झाडावर जाऊन बसतात. असंच काहीसं एका माकडाने खऱ्या आयुष्यात केलं आहे. परंतु यावेळी या माकडाने टोपी वाल्याची टोपी पळवलेली नाही, तर त्याने चक्क एका पोलिसवाल्याची टोपी पळवली आहे. पाहा व्हिडीओ : एका शिकारीसाठी आपसात भिडले सिंह, लढाईत म्हशीने दिला जबरदस्त ट्विस्ट; शेवटपर्यंत पाहा हा VIDEO हो, तुम्ही माकडाच्या हातात पाहू शकता. हा माकड इमारतीच्या उंचावर जाऊन बसला आहे आणि त्याच्या हातात एका पोलिसाची टोपी आहे. हा माकड या टोपीला फारच निरखून पाहात आहे आणि त्याचा वापर कसा करतात? यावर विचार करत आहे.

संबंधित बातम्या

नेटकऱ्यांना हा व्हिडीओ पाहून ‘टोपीवाला आणि माकडं’ या गोष्टीचीच आठवण आली. लोकांनी या व्हिडीओवर जोरदार कमेंट देखील केल्या आहेत. हा व्हिडीओ Praveen Sharma नावाच्या ट्वीटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ युपी मधील असल्याचं कळत आहे. लोकांनी भरभरुन या व्हिडीओला लाईक्स आणि शेअर देखील केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या