JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral Video : पोलिसांपासून वाचण्यासाठी व्यक्तीने वापरली अशी ट्रिक, पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Viral Video : पोलिसांपासून वाचण्यासाठी व्यक्तीने वापरली अशी ट्रिक, पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

हा व्हिडीओ पाहाताना खूपच मजेदार वाटत असला, तरी देखील अशी गोष्ट करण्याचं धाडस तुम्ही करु नका, कारण या व्यक्ती सारखं तुम्ही नशीबवान असालच असं नाही

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 22 ऑगस्ट : सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे, जेथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. तसेच आपल्याला इथे असे काही व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपल्यासमोर उदाहरण म्हणून समोर येतात. तर काही व्हिडीओ हे आपल्याला पोट धरुन हसायला लावतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडीओत एका तरुणाने पोलिसांपासून वाचण्याची वापरलेली निंजा टेक्नीक समोर आली आहे. जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक म्हणजे ते लोक ज्यांना पोलिसांनी रोखले किंवा पाठलाग केला, तर घाम फुटतो. तर काही असे लोक देखील असतात, ज्यांच्यासाठी ही मोठी गोष्ट नाही आणि ते कसं तरी करुन पोलिसांपासून निसटण्यात यशस्वी देखील होतात. अशाच एका व्यक्तीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पोलिसांपासून कसा पळून जातो हे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहाताना खूपच मजेदार वाटत असला, तरी देखील अशी गोष्ट करण्याचं धाडस तुम्ही करु नका, कारण या व्यक्ती सारखं तुम्ही नशीबवान असालच असं नाही वाचा बातमी :  रागाने केला घात! सामान फेकता फेकता स्वतःही बाल्कनीतून खाली कोसळला; Shocking Video व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पोलीस स्कूटर चालवणाऱ्या व्यक्तीचा पाठलाग करत असल्याचे दिसत आहे. त्या व्यक्तीने स्कूटर डावीकडे नेली तेव्हा पोलिसही तिच्या मागे डावीकडे गेले. परंतु तेवढ्यात या व्यक्तीने एका कारजवळून पुन्हा यूटर्न मारला, या व्यक्तीने आपली स्कूटर कारभोवती फिरवली आणि ज्या रस्त्यावरून ती आली होती, त्या रस्त्याने ती व्यक्ती पुन्हा निघून गेली.

दरम्यान, पोलिस व्हॅन चालवणाऱ्या अधिकाऱ्यांना काय झालं हे कळत नाही. त्यांना आधी हा तरुण कुठे गेला, हे लक्षात आले नाही आणि जेव्हा लक्षात आलं, तेव्हा मात्र आपली गाडी मागे कशी वळवावी हे त्यांच्या लक्षात आले नाही. हे सगळं घडे पर्यंत ती व्यक्ती तेथून लांब निघून गेली होती. हा व्हिडीओ पाहून, एका वापरकर्त्याने कमेंट केली की, जेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूचा 100% वापर करता तेव्हा असंच होतं. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तसेच या व्हिडीओला अनेकांनी शेअर देखील केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या