मुंबई 31 ऑगस्ट : सोशल मीडियावर अनेकदा आपल्यासमोर असे काही व्हिडीओ येतात, जे आपल्याला आश्चर्यचकित करतात. तर काही व्हिडीओ हे असे व्हिडीओ असतात, जे पाहून तुम्ही डोक्याला हात लावाल. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो सोशल मीडियावरील सर्वच प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एका ऑटो रिक्षाचा व्हिडीओ आहे, या रिक्षाच्या टपावर तीन मुलं देखील बसलेली दिसत आहेत. जे खूप धोकादायक आहे. तसे पाहाता ही मुलं देखील फारशी मोठी नाहीत, ती 11 ते 13 वर्षाची आहेत. हा रिक्षा वाला जेव्हा या मुलांना अशा पद्धतीने घेऊन जात होता. तेव्हा मागून कोणीतरी हा व्हिडीओ शूट केला आहे. हा व्हिडीओ बरेलीचा असल्याचे समोर आले आहे. हा व्हिडीओ समोर येताच वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हे वाचा : खतरनाक! चिमुकलीच्या हातातील खेळणं पाहून भल्याभल्यांना फुटला घाम; असं आहे तरी काय पाहा VIDEO या चालकाने लहान मुलांचा जीव धोक्यात टाकल्याने अनेकांनी चालकावर टीका केली. व्हिडीओ शेअर करताना एका ट्विटर यूजरने लिहिले की, “हे यूपीमधील बरेलीचे दृश्य आहे. एवढ्या बेफिकीर ऑटोचालकासोबत लोक आपल्या मुलांना शाळेत कसे पाठवतात. या ऑटोने शुक्रवारी आरटीओ कार्यालय आणि पोलिस चौकी ओलांडली मात्र कोणाचेही लक्ष गेले नाही. नोंदणीकृत प्लेट क्रमांकावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.” यानंतर या व्हिडीओची दखल घेत, बरेली पोलिसांनी कलम २७९ (रॅश ड्रायव्हिंग) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. त्यांनी हिंदीतील ट्विटमध्ये लिहिले की, त्यांनी ऑटोरिक्षा चालकाला दंड ठोठावला आहे आणि नियमानुसार कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. मुलांच्या पालकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
छावणी पोलिस स्टेशनचे एसएचओ राजीव कुमार सिंह म्हणाले, ‘आम्ही एका अनोळखी ड्रायव्हरवर रॅश ड्रायव्हिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, कारण त्याने या लहान मुलांचा जीव धोक्यात घातला आहे. सर्व मुलं शालेय गणवेशात होती आणि अशा वाहनचालकांना मुलांचा जीव धोक्यात घालू देऊ नये यासाठी आम्ही शाळा प्रशासनाशीही बोलू. असे ते म्हणाले. हे वाचा : त्याची बाईक रेल्वे ट्रॅकमध्ये अडकली आणि समोरुन ट्रेन आली… घटनेचा थरारक Video व्हायरल तुम्ही देखील तुमच्या मुलांना कोणा ऑटो किंवा प्रायवेट गाडीतून शाळेत पाठवत असाल, तर खात्री करा की, त्यांच्यासोबत असं घडत नाहीय ना.