व्हायरल व्हिडीओ
मुंबई 09 नोव्हेंबर : सोशल मीडियाहे माहितीचं एक भंडार आहे. येथे तुम्हील आलात की तुम्हाला असंख्य गोष्टी नव्याने कळतात. शिवाय येथे तुम्हाला अनेक व्हिडीओ देखील दिसतील. टॅक्नोलॉजी थोडी बदलली आहे, त्यामुळे आता तुम्हाला कोणतीही माहिती तुम्हाला व्हिडीओच्या स्वरुपातच मिळेल. तसेच इथे तुम्हाला काही मनोरंजक व्हिडीओ देखील पाहायला मिळतील. तर काही व्हिडीओ हे अगदी अंगावर काटा आणणारे असतात. सध्या असाच एका अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो एका अपघाताचा आहे. या व्हिडीओमध्ये एका गाडीसोबत असा काही अपघात घडतो की, संपूर्ण दृश्य पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल. हा व्हिडीओ तसे पाहाता सगळ्यांसाठी एक उदाहरण म्हणून देखील समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला अशी चुक न करण्याचा इशारा देत आहे. हे ही पाहा : Watch Video : मोबाईल चोरून पळाला चोर, पण दुसऱ्याच क्षणी घडलं असं काही की मिळालं ‘कर्माचं फळ’ तसे पाहाता आपल्याला रस्त्याने चालताना नेहमी सतर्क राहिले पाहिजे, मग तुम्ही गाडी चालवत असू देत किंवा रस्त्याने चालत असेल, तरी देखील कधी कोणती परिस्थीती समोर येईल हे काही तुम्ही सांगू शकणार नाही. असंच काहीसं एका कारच्या बाबतीत घडलं, हा व्हिडीओ पाहून तुमचा श्वासही काही क्षणांसाठी थांबेल. रस्त्यावर कधीही काहीही होऊ शकते हे काही सेकंदांच्या या व्हिडिओने सिद्ध केले. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा शेअर केला गेला आहे. नक्की काय घडलं? या व्हिडीओमध्ये काही गाड्या आहेत. ज्या एका मोठ्या ट्रकच्या मागे रांगेत आहे. ज्यामध्ये एक कार ट्रकच्या एकदम मागे धावत असते, या ड्रायव्हरला कसा ही मार्ग काढून या ट्रकच्या पुढे जायचे असल्याचे या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
पण तेवढ्यात या कार चालकाचा कारवरील नियंत्रण सुटतो आणि कार रस्त्याखाली उतरते, ज्यानंतर ती पुन्हा रस्त्यावर येते आणि मग पुन्हा रस्त्याखाली उतरते. ज्यानंतर ती थेट जंगलात जाऊन एका झाडाला जोरदार आदळते आणि सगळीकडे धुराचे लोट होते. हे दृश्य पाहून अनेकजण थक्क झाले. व्हिडाओ पाहून काही लोकांनी रस्ता सुरक्षेबाबत सल्लाही दिला.
हा व्हिडीओ vee नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो लोकांनी लाईक आणि शेअर देखील केला आहे.