व्हायरल व्हिडीओ
मुंबई २४ नोव्हेंबर : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. आपल्यासमोर दररोज हजारो व्हिडीओ येत असतात. ज्यांपैकी काही व्हिडीओ हे खरंच आपल्या मनात घर करुन बसतात. पण काही व्हिडीओ असे देखील असतात. जे आपल्या हृदयाचा ठोका चुकवतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळणार नाही. तसे पाहाता हा व्हिडीओ खूपच मनोरंजक आहे. पण या व्हिडीओमध्ये हा तरुण जे करतोय ना ते पाहून, ‘‘आ बैल मुझे मार…’’ तुम्हाला हेच सुचेल. आजकालची तरुण पिढी काही तरी तुफानी करण्याच्या नादात स्वत:च्या जिवाची देखील पर्वा करत नाही आणि मग कधीकधी आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येते. हे ही वाचा : ती पडली, सरकली आणि अचानक गायब झाली… रस्ता अपघाताचा ‘हा’ व्हिडीओ ठरला चर्चेचा विषय या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण बैलासमोर उभा आहे आणि बैल त्याला मारताना दिसत आहे. सुरुवातीला असं वाटलं की कदाचित हा तरुण चुकून येथे अडकला असावा. पण सत्य काही वेगळंच आहे. व्हिडीओमध्ये पुढे आणखी एक व्यक्ती येते आणि बैलाचं लक्ष वळवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर पुन्हा हा तरुण बैलासमोर नाचताना आणि काही तरी विचित्र करताना दिसत आहे. काही वेळापूर्वी बैलापासून जीव वाचवत फिरत असलेला व्यक्ती व्हिडीओमध्ये पुढे भलतंच करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये हा तरुण बैलाच्या पाठीवर बसण्यासाठी प्रयत्न करतो आणि त्यासाठी तो निंजा टेक्निकचा वापर करतो. तो आपल्या हातांवर उभा राहातो आणि बैलाने उडवताच, त्याच्या मानेवर जाऊन बसतो. परंतू तो पुन्हा पडतो आणि पुन्हा तिच टेक्निक वापरुन तो बैलावर चढतो.
बैलाचा असा हल्ला अनेक बाबतीत जीवघेणाही ठरू शकतो. बैलांना राग आला की तो कोणाचंही ऐकत नाही. अशीवेळी त्याची शिंग जरी घुसली तरी देखील ते किती महागात पडू शकतं. पण या तरुणाला त्याचं काहीच नाही.
हा व्हिडीओ इस्टाग्रामवर quenemcachorro नावाच्या अकाउंटवरुन शेअर केला गेला आहे. ज्यावर लोकांनी भरभरुन कमेंट्स आणि लाईक केलं आहेत.