JOIN US
मराठी बातम्या / Viral / धाडसी आजी! नागाची शेपटी पकडून त्याला घराबाहेर काढलं, VIDEO VIRAL

धाडसी आजी! नागाची शेपटी पकडून त्याला घराबाहेर काढलं, VIDEO VIRAL

IFS ऑफिसर सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. कोब्रा जातीच्या सापासोबत आजीची ही वागण्याची पद्धत योग्य नाही असं त्यांनी कॅप्शन दिलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 मे : साप आणि त्यातही नाग म्हटलं की अंगावर शहारे येतात आणि भीतीनं शरीर थरथर कापायला लागतं. गेल्या काही दिवसांमध्ये घरातून साप निघण्याचं प्रमाण वाढत आहे. असंच एका घरात कोब्रा जातीचा नाग आढळला. आजीनं मोठी हिम्मत करून या सापाची शेपटी पकडली आणि त्याला फरफटत घराबाहेर काढलं. आजीच्या या धाडसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आजीनं या नागाच्या शेपटीला दोरीसारखं पकडलं आणि मोकळ्या जागेत फरफटत घेऊन गेली आणि भिरकावून लावलं. कोब्रा आणि नाग शब्द उच्चारला तरी भल्या भल्यांची जिथे बोबडी वळते तिथे आजींनं हिम्मत दाखवून नागाची पुंगी वाजवली आहे.

संबंधित बातम्या

हे वाचा- धडक दिल्यानंतर झाडासह टँकर धावत होता, विचित्र अपघाताचा VIDEO व्हायरल

जाहिरात

IFS ऑफिसर सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. कोब्रा जातीच्या सापासोबत आजीची ही वागण्याची पद्धत योग्य नाही असं त्यांनी कॅप्शन दिलं आहे. सुशांत नंदा यांनी 26 सेकंदाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ 2 लाखहून अधिक लोकांनी पाहिला आहे. काही युझर्सनी आजीच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. आजीनं या सापापासून स्वत:चं संरक्षण केलं आहे असंही काही युझरनं म्हटलं आहे. हे वाचा- धक्कादायक परिणाम! कोरोनाची पहिली लस दिलेला तरुण आधी झाला बेशुद्ध मग… हे वाचा- काँग्रेस लाचार, जनाची नाही.. मनाची असेल तर सत्तेबाहेर पडा, विखे पाटलांची टीका संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या