व्हायरल व्हिडीओ
मुंबई 15 ऑक्टोबर : सोशल मीडियावर नेहमीच असे काही व्हिडीओ व्हायरल होत असतात जे मनोरंजक असतात. तर काही व्हिडीओ हे असे असतात जे त्याच्या वेगळेपणामुळे सोशल मीडियावर जोरजार व्हारल होत असतात. लोकांना लहान मुलांचे व्हिडीओ पाहायला फारच आवडतात. खरंतर लहान मुलं ही फारच निरागस असतात. त्यामुळे ते जे काही करतात, ते पाहाताना आपल्या देखील आनंद मिळतो. सध्या लहान मुलांचा असाच एक खूपच गोड व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमचा दिवस बनेल आणि तुम्हाला हसू आल्याशिवाय राहाणार नाही. खरंतर दोन लहानमुलं घरच्याघरी लपंडाव खेळत असतात. ज्यामध्ये लहान मुलगा डोळे बंद करतो आणि त्याची चिमूकली बहिण ही लपायला जाते. खरंतर या चिमूकलीला चांगल्या जागी लपण्यासाठी तिच्या घरातील लोक तिला मदत करतात आणि एका अंधाऱ्या ठिकाणी तिला नेऊन लपायला सांगतात. या चिमूकलीचा भाऊ जेव्हा डोळे उघडतो तेव्हा त्याला त्याची बहिण कुठेच दिसत नाही. तो इकडे-तिकडे तिला शोधतो परंतू त्याला काही शोधता येत नाही. मग अखेर तो आपल्या बहिणीला शोधण्यासाठी एक युक्ती लावतो. हेही पाहा : Delivery boy बिल्डिंग खाली असं काही करताना दिसला; VIDEO समोर येताच सोशल मीडियावर होऊ लागला ट्रेंड हा चिमूकला फारच हुशार आहे. तो कविता बोलायला सुरूवात करतो, जसं तो म्हणतो, ‘‘जॉनी जॉनी…’’ तेवढ्यात लपलेल्या चिमूकलीला ही कविता पूर्ण करण्याचा मोह आवरत नाही ती पुढे, ‘‘यस पापा….’’ असं बोलून जाते. पण तिच्या आवाजाचा कानोसा घेत तिचा भाऊ तिला शोधून काढतो. तुम्ही आधी हा व्हिडीओ पाहा तो तुम्हाला नक्की आवडेल.
हा व्हिडीओ rvcjinsta’s नावाच्या अकाउंटवरुन इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ज्यावर ‘लाईफ हॅक’ असं कॅप्शन देखील लिहिलं गेलं आहे. या व्हिडीओला लोकांकडून खूपच पसंती दर्शवली गेली आहे. साप मागे लागला म्हणून सैरावैरा पळू लागला तरुण, सत्य समोर आलं तेव्हा… पाहा Video हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हे नक्की पटेल की लहान मुलं ही खरंच निरागस असतात. ते कशाचाही विचार न करता आपल्या परीने गोष्टी करत असतात. लोकांनी देखील यावर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.