JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral : पोपटानं मित्राला दिला शेवटचा निरोप, पक्ष्याच्या मनाची भावना दाखवणारा हा video खूपच भावुक

Viral : पोपटानं मित्राला दिला शेवटचा निरोप, पक्ष्याच्या मनाची भावना दाखवणारा हा video खूपच भावुक

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये अनेक प्रकारचे व्हिडीओ पहायला मिळतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही हृदयाला स्पर्श करुन जातात.

जाहिरात

हृदयस्पर्शी व्हिडीओ

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 3 जानेवारी:  सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये अनेक प्रकारचे व्हिडीओ पहायला मिळतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही हृदयाला स्पर्श करुन जातात. लोकांना अशा प्रकारचे व्हिडीओ खूप आवडतात. विशेषतः प्राण्यांचे व्हिडीओ. आत्तापर्यंत तुम्ही प्राण्यांचे अनेक प्रकारचे व्हिडीओ पाहिले असतील. अशातच आणखी एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नुकताच समोर आलेला व्हिडीओ हा पोपटाचा आहे. पोपटाच्या एका व्हिडीओने सध्या सगळ्यांना भावुक केलं आहे. त्याचाच हृदयस्पर्शी व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय. व्हिडीओमध्ये चक्क एक पोपट आपल्या साथीदाराच्या मृत्यूवर दुःख व्यक्त करत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत अश्रू तरळ्याशिवाय राहणार नाही. हेही वाचा -  नवरी आयुष्यभर लक्षात ठेवेल लग्नाचा ‘तो’ क्षण, नवऱ्याने सगळ्यांसमोर….,पाहा Video व्हिडीओ पाहून तुमचीही खात्री होईल की, फक्त माणसालाच नाही तर प्राण्यांनाही भावना, संवेदनशीलता असतात. त्यांनाही गोष्टींचा त्रास होतो. त्यांच्याही भावना असतात. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहू शकता, एक पोपट त्याच्या साथीदाराजवळ बसला आहे. आणि तो त्याच्या साथीदाराला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. पोपटाचा साथीदार हे जग सोडून गेला असून त्याच्या निरोपाची तयारी सुरु आहे. पोपट त्याच्या साथीदाराच्या जवळ जातो आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करतो. तो त्याच्या चोचेला चोच मारतो, तर कधी त्याच्या पायाजवळ जाऊन त्याला उठवण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. व्हिडीओ खूपच भावूक असून तुम्हीही भावूक व्हाल.

दरम्यान, व्हिडीओमध्ये मृत पोपटाला एका बॉक्समध्ये ठेवलं आहे. त्याच्यावर काही फुलेही वाहण्यात आलेली आहे. लोक व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया देत आहेत. @susantananda3 नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओसोबत कॅप्शन देण्यात आले आहे, ‘गुडबाय, आम्ही पुन्हा भेटू तोपर्यंत आम्ही तुम्हाला मिस करू. प्राण्यांनाही संवेदनशीलतेने वागवा. व्हिडिओ शेअर केल्यानंतर काही तासांतच 22 हजारांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे आणि 1000 हून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या