दिल्ली अपघात, 4KM तरुणीला फरफटत नेलं
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीमध्ये संतापजनक घटना घडली.
दिल्लीतील कांझावाला भागात ही घटना घडल्याचं समोर आलं आहे.
दिल्लीमध्ये दारूच्या नशेत पाच तरुणांनी तरुणीला 4 किमी फरफटत नेलं.
4 किमी फरफटत नेल्यामुळे पीडित मुलीची सगळी हाडं तुटली आणि तिचा मृत्यू झाला.
पीडित तरुणीचा मृतदेह नग्न अवस्थेच मिळाला.
दिल्लीच्या सुलतानपुरी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दारुच्या नशेत असल्यामुळे बाहेर तरुणी अडकली असल्याचं तरुणांना समजलं नाही.
या घटनेमुळे संपूर्ण देशाला हादरुन टाकलं आहे.
दिल्ली पोलिसांनी पाचही आरोपी युवकांना अटक केली आहे.