JOIN US
मराठी बातम्या / Viral / Reels बनवणं तरुणांना पडलं महागात, व्हिडीओ काढताना केली अशी गोष्ट, आता जावं लागणार तुरुंगात

Reels बनवणं तरुणांना पडलं महागात, व्हिडीओ काढताना केली अशी गोष्ट, आता जावं लागणार तुरुंगात

सध्या एक असाच व्हिडीओ यूपीमधून समोर आला आहे. ज्याला शेअर करणं या तरुणाला भलतंच महागात पडलं आहे.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो, सोर्स : गुगल

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ 9 सप्टेंबर : सोशल मीडियावर व्हिडीओ किंवा फोटो शेअर करण्याचं वेड तर सगळ्यात तरुण-तरुणींना आहे. एवढंच काय तर आता वद्ध देखील यामध्ये उतरले आहेत. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी देखील अनेक मंडळी अगदी काहीही करण्याची तयारी दाखवतात. यासाठी ते आपल्या जीवाची देखील पर्वा करत नाहीत. त्यात रिल्सने तर सगळ्यांनाच वेड लागलं आहे. सध्या एक असाच व्हिडीओ यूपीमधून समोर आला आहे. ज्याला शेअर करणं या तरुणाला भलतंच महागात पडलं आहे. यूपीमध्ये गोळीबाराच्या घटना दररोज ऐकायला मिळतात. लग्न कारयात येथे लोक सर्रास गोळीबार करतात. परंतू यामुळे होणाऱ्या अप्रिय घटना लक्षात घेता सरकारने यावर बंदी घातली आहे. दरम्यान, सायबर सिटी नोएडामध्ये रील बनवताना एक तरुण हातात पिस्तूल घेऊन गोळीबार करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नोएडातील ठाणे एक्स्प्रेस वे भागातील असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये एक तरुण हातात पिस्तूल धरून रील काढत आहे. हे वाचा : Zoo मधून पळालेला चिंपांझीचे नखरेच भारी, अनेक विनंत्या करुन देखील परतायला तयार नाही, अखेर… पाहा Video व्हिडिओमध्ये तरुण पिस्तूलने गोळीबारही करत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गोळीबार करणाऱ्या तरुणाच्या मागे एक तरुण उभा असल्याचे दिसत आहे, तर दुसरा तरुण व्हील चेअरवर बसलेला आहे. त्याचवेळी, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक फोटो कोलाज देखील आहे ज्यामध्ये दोन तरुण हातात शस्त्रे धरून आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे शहरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शहरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करून पोलिसांकडून व्हिडीओत दिसणाऱ्या तरुणांवर कडक कारवाई करण्याची मागणीही केली होती. ट्विटमध्ये लिहिले आहे की, दोन्ही तरुण नोएडाच्या सेक्टर-135 चे रहिवासी आहेत. ट्विट करणाऱ्या व्यक्तीने लिहिले आहे की, दोघेही रोज गोळीबार करत असतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितले की, व्हायरल झालेल्या व्हिडीओतील तरुणांची ओळख पटवून माहिती गोळा केली जात आहे. या तरूणांना पकडण्यासाठी पोलीस छापे टाकत आहेत. हे वाचा : तरुणीने जुळ्या मुलांना दिला जन्म, पण त्या दोघांचे वडिल मात्र वेगळे, नक्की काय आहे हे प्रकरण? वाचा अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही नोएडामध्ये अशाप्रकारचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये लोक पिस्तूल, कार किंवा बाईक घेऊन स्टंट करत असतात. ज्यामुळे या स्टंट करणाऱ्यांच्याच नाही तर इतर लोकांच्या जीवाला देखील धोका असतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या