मुंबई 1 सप्टेंबर : सर्वत्र लोक गणेशोत्सवाच्या रंगात दंग झाले आहेत. लोक बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी अनेक मंडळांना भेट देवू लागले आहेत. ज्यासाठी लोक लांबच लांब रांगा लावतात. परंतु अशातच एका मंडळाने अशी एक युक्ती शोधून काढली, ज्यामध्ये ते आधारकार्डच्या माध्यमातून लोकांना बाप्पाचं लाईव दर्शन देखील देऊ शकतील आणि लोकांना एक चांगला संदेश देखील. आता तुमच्या डोक्यात वेगवेगळे प्रश्न यायला सुरु झाले असतील की, हे आता नक्की काय आहे? चला तर याबद्दल माहिती जाणून घेऊ. खरंतर हा उपक्रम जमशेदपूरमध्ये चालवला जात आहे. ज्यामध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी मोठा आधार कार्ड लावला गेला आहे. ज्यावर बाप्पची संपूर्ण माहिती, जसे की त्याचं नाव, जन्म तारीख आणि जेंडर लिहिलं गेलं आहे. परंतू फोटोचा भाग हा खाली सोडण्यात आला आहे. हा खूप मोठा आधार कार्ड आहे, ज्यावर एक कोड देखील लावला गेला आहे. हा कोड जर तुम्ही स्कॅन केलात तर तुम्हाला त्या आधार कार्डवर बाप्पाचा फोटो दिसू लागेल आणि तुम्हाला बप्पाचं दर्शन मिळेल आहे ना खूपच मस्त आईडिया. हे पाहताना लोकांना फारच मजेशीर वाटत आहे. ज्यामुळे लोक या बप्पासोबत सेल्फी देखील घेत आहेत.
सोर्स : ANI
हे वाचा : QRcode आणि Barcode सारखे वाटत असले तरी, त्याचं काम मात्र वेगळं, कसं? ते समजून घ्या या पूजा मंडळाचे संयोजक सौरभ कुमार यांनी सांगितले की, एकदा ते कोलकाता येथे गेले होते आणि तेथे त्यांनी विविध प्रकारचे पूजा मंडळ पाहिले, जे सामान्य माणसाच्या जीवनाशी संबंधित होते. तेथून त्यांना असं करण्याची कल्पना आली. याद्वारे त्यांना लोकांना माहिती सांगायची होती.
हे वाचा : Dagdusheth Ganpati : ‘दगडूशेठ’ चे गणपती बाप्पा श्री पंचकेदार मंदिरात विराजमान, पाहा Photo याबाबात महिती देताना त्यांनी सांगितलं की, अनेक सार्वजनिक गणेश मंडळात लोक काही देखावे पाहण्यासाठी येतात, जे लोकांना काहीना काही माहिती पुरवतात आणि त्यांच्यात जागृती निर्माण करतात. आमचाही उद्देश असाच आहे. आधार कार्ड सध्या खूप महत्वाचा दस्ताऐवज मानला जातो आणि लोकांना याची गंभीरता समजावी आणि याबाबत माहिती मिळावी, म्हणून आम्ही ते लावलं आहे.