व्हॅटिकन, 06 फेब्रुवारी: ‘जसा देश तसा वेश’ असं म्हटलं जातं. यालाच इंग्रजीत ‘When In Rome, Do As Romans Do’ अशा अर्थाची म्हणही वापरली जाते. तुम्ही ज्या ठिकाणी आहात, तिथल्या परिस्थितीप्रमाणे वागा असा याचा अर्थ होतो. नाहीतर तुम्हाला लाजिरवाण्या परिस्थितीलाही सामोरं जावं लागू शकतं. याचाच प्रत्यय एका महिलेला रोमच्या अगदी जवळ असलेल्या व्हॅटिकन सिटीमध्ये आला (Woman kicked out of Vatican City). व्हॅटिकन सिटी हे ख्रिश्चन धर्मीयांसाठीचं जगातील सगळ्यांत पवित्र स्थळ मानलं जातं. एका महिलेनं घातलेल्या कपड्यांमुळे तिला व्हॅटिकन सिटीमधून अक्षरश: धक्के मारुन बाहेर काढण्यात आलं. (Woman wearing vulgar clothes asked to leave Vatican) सध्या इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर (Instagram Influencer Juju Vieira) जुजू विएरा बरीच चर्चेत आहे. जुजू मूळची ब्राझीलची रहिवासी आहे आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून तिला ओळखलं जातं. इन्स्टाग्रामवर तिचे 26 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. मात्र जुजूसोबत व्हॅटिकन सिटीमध्ये जे घडलं त्यामुळे सध्या ती जास्तच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी जुजू व्हॅटिकन सिटीमध्ये फिरण्यासाठी गेली होती. आपल्याला माहिती आहे की ख्रिश्चन धर्मियांसाठी हे एक अत्यंत पवित्र स्थळ मानलं जातं. मात्र जुजूनं इथं जाताना असे कपडे परिधान केले होते की त्यामुळे तिथले लोक तिच्यावर प्रचंड चिडले आणि त्यांनी जुजूला अक्षरश: तिथून ताबडतोब हाकलून लावलं.
व्हॅटिकनमध्ये जूजूचा फोटो (Jam Press/@jujuvieira_oficial)
डेली स्टारनं याबद्दलचा रिपोर्ट दिला आहे. जुजूनं गुडघ्याच्या वर असलेला बॅकलेस ओव्हरकोट घातला होता आणि लाँग बूट घातले होते. मात्र तरीही तिला तिच्या कपड्यांमुळे तिथे थांबण्याची परवानगी नाकारण्यात आली. जुजूनं याबद्दल इन्स्टाग्रामवर पोर्तुगीज भाषेत एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तिनं तिथं काय घडलं हे पोर्तुगीजमध्ये सांगितलं आहे. ‘मी तिथं अन्य लोकांप्रमाणेच फोटो काढण्यासाठी गेले होते. पण तेवढ्यात तिथे काम करणारा एकजण आला आणि त्यानं सांगितलं की ही प्रार्थना करण्याची जागा आहे. तुम्ही योग्य कपडे घातलेले नाहीत त्यामुळे तुम्हाला इथून लगेचच जावं लागेल,’ असं जुजूनं मेसेमध्ये लिहिलंय. हे वाचा- Video :दुर्दैवी! आभाळ समजून इमारतीच्या काचेला पक्ष्यांच्या थव्याची धडक,34 मृत्यू या घटनेमुळे ती खूप दुखावली गेली आणि तिनं या व्हिडीओमार्फत आपली नाराजी व्यक्त केली. तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांनी हे सगळं ऐकलं त्यामुळे आपल्याला जास्त लाज वाटली असं जुजूनं म्हटलं आहे. या व्हिडीओनंतर जुजूला अनेकांनी पाठिंबा दिला आहे मात्र काहीजणांनी तिच्यावर टीकाही केली आहे. ब्राझीलमध्ये तू असे कपडे घातलेस तर कोणी काही म्हणणार नाही, पण व्हॅटिकन अत्यंत पवित्र जागा आहे, त्यामुळे तिथं असं करणं योग्य नाही,असं एका व्यक्तीनं ऑनलाईन प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. हे वाचा- VIDEO - स्टेजवर फ्रेंड्सनी केलं असं काही की नवरदेवाला मिठी मारत ढसाढसा रडली नवरी एका अधिकृत वेबसाईटच्या माहितीनुसार व्हॅटिकनमध्ये पुरुष आणि स्त्रियांसाठी विशेष ड्रेस कोड (Vatican City Dress Code) ठरवण्यात आला आहे. इथं महिला स्लिव्हलेस टॉप, क्रॉप टॉप किंवा टाईट शर्ट घालून प्रवेश करु शकत नाहीत. त्यांचे खांदे झाकलेले पाहिजेत आणि स्कर्ट किंवा ड्रेसही गुडघ्यापेक्षा खाली असावा अशा अटी आहेत. स्त्रिया शाल किंवा लेगिंन्स घाऊन आल्या तर जास्त चांगलं असं या वेबसाईटमध्ये म्हटलं आहे. तर पुरुषांसाठीही ठराविक ड्रेस कोड आहे. मात्र या ड्रेसकोडबद्दल आपल्याला माहिती नव्हतं असं जुजूचं म्हणणं आहे. त्यामुळे आपण हा ड्रेस घालून गेलो होतो असं तिनं म्हटलंय. पण या घटनेमुळे जुजूची चर्चा तर झाली हे मात्र खरं.