JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral : गणिताच्या टीचरने विचारला असा प्रश्न; शाळेत सरांनी दिलेल्या फटक्यांची येईल आठवण

Viral : गणिताच्या टीचरने विचारला असा प्रश्न; शाळेत सरांनी दिलेल्या फटक्यांची येईल आठवण

गणित हा विषय काहींना खूप सोपा तर काहींना खूप जास्त कठीण जातो. अनेक विद्यार्थ्यांना तर या विषयाचा तास नको नकोसा होतो.

जाहिरात

Google वर सार्वधिक सर्च झालेलं गणित

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : गेल्या वर्षी ट्विटरवर शेअर केलेल्या गणिताच्या प्रश्नाने (Maths Problem) इंटरनेटवर (Internet) लोकांना दोन भागात विभागलं होतं. आणि यातील सर्वजणं आपआपल्या उत्तर बरोबर असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत होते. यामध्ये कोणाचं उत्तर योग्य आणि कोणाचं अयोग्य, याबद्दल कोणीच नेमकं सांगू शकत नव्हत. आता गणिताचा आणखी एक प्रश्न आणि त्याच्या उत्तरावरुन सोशल मीडियावर लोक एकमेकांसोबत वाद घातल आहेत. यातील सर्वजण आपलं उत्तर योग्य असल्याचं सांगत आहेत. गणिताच्या या प्रश्नाने ऑनलाइन विश्वात खळबळ उडवली आहे. (A question asked by a math teacher goes viral on social media) @ABlondeAvocado नावाच्या युजरने गणिताचा एक प्रश्न सोशल मीडियावर पोस्ट केला आणि लोकांना ते सोडवण्याचं आव्हान दिलं. या पोस्टमध्ये या गणिताच्या शिक्षकाकडून 18x5 हा प्रश्न केवळ मानिसक प्रयत्नांनतून सोडविण्यास सांगण्यात आलं आहे. हे ही वाचा- VIDEO : चिमुरड्याने सैन्याची गाडी पाहताच केलं असं काही की डोळ्यात पाणीचं येईल यावर एका महिलेने उत्तर देताना लिहिलं की, मी 18 ला 20 या अंकात बदललं आणि मग 20x5=100 अशी सुरुवात केली. त्यानंतर 2x5=10, 100 – 10 =90. कदाचित मी कठीण पद्धतीचा अवलंब केला. मात्र काही असलं तरी मी योग्य उत्तरापर्यंत पोहोचले आहे.

अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अनेकजण तर हा प्रश्न पाहून हैराण झाले आहेत.

90 या योग्य उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी लोक विविध प्रकारच्या पद्धतीचा अवलंब करीत आहेत. यात कोणती पद्धत योग्य आणि कोणतही अयोग्य हे सांगणं जरा कठीणच आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या