मुंबई, 23 मार्च : भारतात कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी सगळे नागरिक आपापल्या घरात जनता कर्फ्यू लावल्यानंतर बसले असताना पोलीस मात्र जागेजागी आपल्या ड्युटीवर तैनात होते. भारतात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अशावेळी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांच्या कुमक तैनात करण्यात आल्या आहेत. दिवसभर डोळ्यात तेल घालून ड्युटी करत असलेल्या या पोलिसांना एका महिला गटानं संध्याकाळचा नाश्ता आणून दिला. रात्रदिवस आपल्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या या पोलिसांना सखी ग्रूपनं खाण्याची सोय करून दिली. रविवारी संध्याकाळी 5 वाजता शंखनाद टाळ्या वाजवतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले पण त्यामध्ये हा व्हायरल झालेला एक व्हिडीओ काळजाचा ठाव घेणारा आहे. आपल्या कर्तव्यात कसूर न करता तासंतास आपली ड्युटी करत उभ्या असलेल्या या पोलिसांना सखी ग्रूपच्या महिलांनी नाश्ता दिला. महिलांच्या आग्रहाखातर हा नाश्ता पोलिसांनी ठेवून घेतला. या महिलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे वाचा- त्या डॉक्टरचं ऐकलं असतं तर कोरोनाने जग व्यापलं नसतं, चीनने कुटुंबीयांची मागितली
या व्हिडीओमध्ये महिला पोलिसांना चहा, बिस्किटे आणि पोहे देताना दिसत आहेत. व्हिडीमध्ये आपण पाहू शकता की जेव्हा महिला पोलिसांसाठी न्याहारी आणतात तेव्हा पोलिस त्यांना तेथून परत घरी जाण्याचा सल्ला देतात. अशा परिस्थितीत स्त्रिया प्रथम त्यांना नाश्ता करण्यास सांगतात, तोपर्यंत आम्ही उभे आहोत, कोणीही घराबाहेर पडणार नाही. यासह महिला पोलिसांचा आभार मानत आहेत. हा व्हिडिओ भारतीय वन सेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारकडून लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. हे वाचा- पुण्यात 3 वाजल्यापासून अखेर पूर्ण लॉकडाऊन, बेशिस्तपणाला लगाम लावण्यासाठी निर्णय