ब्राझील, 31 जानेवारी: ब्राझीलच्या (Brazil) समुद्रात (Sea) नेहमीप्रमाणे मासेमारी करण्यासाठी गेलेल्या एकाला (Fisherman) अचानक समुद्रात एक मोठा प्राणी (Strange big animal) दिसला. त्याचा अवाढव्य आकार आणि चकाकणारे डोळे (Shining eyes) पाहून त्याची पाचावर धारण बसली आणि त्याने तिथून पळ काढला. आपल्या स्पीड बोटीतून (Speed Boat) त्याने शक्य तेवढ्या वेगाने तिथून किनाऱ्याकडे धाव घेतली. मात्र या अगम्य प्राण्याने त्याचा पाठलाग (Chase) सुरू ठेवला. स्वतः मच्छिमारानेच मग आपल्या मोबाईलचा कॅमेरा सुरू केला आणि या घटनेचं चित्रिकरण केलं. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.
समुद्रात दिसला गूढ प्राणी ब्राझीलमधील रिओ ग्रँड द सूल भागातील समुद्रात एक मच्छिमार मासे पकडण्यासाठ स्पीड बोट घेऊन गेला होता. रात्रीच्या सुमाराला त्याला अचानक समुद्रात काहीतरी चकाकत असल्याचं दिसलं. त्याने लक्ष देऊन पाहण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत ती गोष्ट गायब झाली. त्यानंतर काही क्षणांनी पुन्हा एकदा मच्छिमाराला काही चकाकत असल्याचं दिसलं. यावेळी मात्र चकाकणारी गोष्ट म्हणजे समुद्रातील एका अगम्य प्राण्याचे डोळे आहेत, हे त्याला समजलं. हा प्राणी बोटीवर हल्ला करण्याच्या तयारीत होता आणि बोटीवर झेपावू पाहत होता. हे वाचा - खेळता-खेळता स्विमिंग पुलमध्ये कोसळली चिमुकली अन्..; मच्छिमाराने काढला पळ समुद्रातील तो अजब प्राणी आपल्यावर हल्ला करू पाहत असल्याचं लक्षात येताच मच्छिमाराने तिथून पळ काढण्याचा निर्णय घेतला आणि शक्य तेवढ्या वेगाने आपली स्पीड बोट चालवत तो किनाऱ्याकडे येऊ लागला. चमकणाऱ्या डोळ्यांचा तो प्राणी त्याचा पाठलाग करत होता. पेंग्विनप्रमाणे पाण्यावर उड्या मारत त्या प्राण्याने पाठलाग सुरूच ठेवला होता. मच्छिमाराने आपला मोबाईल काढून हा पाठलाग रेकॉर्ड केला. त्या प्राण्याच्या चमकणाऱ्या डोळ्यांमुळेच आपल्यावरचं संकट आपण ओळखू शकलो, अशी प्रतिक्रिया त्याने दिली. अखेर स्पीड बोडच्या पाठिमागे पाण्याचा मोठा फवारा सतत तोंडावर आल्यामुळे त्या प्राण्याने बोटीचा नाद सोडला आणि तो माघारी वळला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.