पंचकूला, 28 जून : शहरातील रायपूर रानीच्या नाल्यात सोमवारी सकाळी एक मृत भ्रूण सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृत भ्रूण सापडल्यानंतर गावभर याची चर्चा सुरू आहे. यादरम्यान एस सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. ज्यामुळे संपूर्ण प्रकरण समोर आलं. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिलेने अर्भकाला जन्म दिल्याचं दिसत आहे. आणि आपल्याच हाताने नाल्यातही फेकून दिलं. हे दृश्य अंगावर काटा आणणारं आहे. सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली, आता ते आरोपींचा शोध घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रायपूर रानी भागातील एका गावात राहणारे दीपक कुमार आणि त्यांची पत्नी आपल्या घराबाहेर साफ-सफाई करीत होते. यादरम्यान त्यांची नजर नाल्यातील भ्रूणाजवळ गेली. त्यांना तातडीने याबाबत पोलिसांना कळवलं आणि नाल्यातून मृत भ्रूण बाहेर काढून पेटीत ठेवलं. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. सध्या हे भ्रूण ताब्यात घेण्यात आलं असून रुग्णालयात पाठविण्यात आलं आहे. हे ही वाचा- Girlfriend ची सटकली; Breakup नंतर Boyfriend चा सूड उगवण्यासाठी 23 लाखांना आग महिला आणि तरुणाचा व्हिडीओ आला समोर समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक महिला रस्त्याच्या किनाऱ्यावर बसलेली दिसत आहे. दुसरी महिला आणि एक तरुण तिच्यासमोर उभा आहे. हे तिघेही एका मेडिकल स्टोअरच्या समोर आहेत. रस्त्याच्या कडेला बसलेली महिला एका भ्रूणाला जन्म देते आणि दुसरी महिला ते नाल्यात फेकायला सांगते. महिला अत्यंत निर्दयीपणे ते भ्रूण नाल्यात फेकून देते. यानंतर तिघे बाईकवरून तिथून निघून जातात.
संपूर्ण गावभर चर्चा भ्रूण हत्येच्या या घटनेनंतर संपूर्ण गावात याची चर्चा आहे. सोबतच व्हिडीओ समोर आल्यानंतर लोक आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे पोलिसांचं म्हणणं आहे की, आरोपींची लवकरच ओळख पटविण्यात येईल. या घटनेमुळे स्थानिकदेखील नाराज झाले आहेत.