JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO : ...आणि हृदयाचा ठोकाच चुकला, रेल्वे ट्रॅकवर उभी होती बस; समोरून भरधाव वेगानं आली ट्रेन

VIDEO : ...आणि हृदयाचा ठोकाच चुकला, रेल्वे ट्रॅकवर उभी होती बस; समोरून भरधाव वेगानं आली ट्रेन

समोर गाड्यांची रांग असल्या कारणाने बसला पुढे जायला मार्गच नव्हता, या बसमधून 40 प्रवासी प्रवास करीत होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जबलपूर, 25 जून: चित्रपटाप्रमाणे एक थरारक व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहताना तुमच्या अंगावर शहारे उभे राहतील. ही घटना जबलपूर येथे घडली आहे. एक प्रवासी बस रेल्वे ट्रॅकवर उभी आहे आणि समोरून ट्रेन येत आहे. समोर जलद गतीने येणारी ट्रेन पाहून बसमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या हृदयाचे ठोके वाढले. ट्रेन जवळ येत असल्याचं पाहून प्रवाशी पटा पटा बसमधून उतरू लागले. दरम्यान गेट बंद होत असल्याची घोषणाही केली जात आहे. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनात आता काय होईल, याची भीती होती. ही घटना सिहोरा भागातील खितौला रेल्वे फाटकाजवळ घडली आहे. जायस्वाल ट्रॅव्हल्सची बस MP-20-PA-2269 रेल्वे ट्रॅक पार करीत होती. समोर गाड्यांची भलीमोठी रांग असल्यामुळे बसला पुढे जायला वाटच नव्हती. बराच वेळ झाला तरी वाहतूक कोंडी कमी होत नव्हती. यादरम्यान समोर ट्रेन येत असल्याचे पाहून सर्वजण बाजूला झालं. तर बसमधील प्रवासी मुला-बाळांना घेऊन खाली उतरले. या बसमध्ये तब्बल 40 प्रवासी बसले होते. ते खाली उतरून पळू लागले. जलद गतीने येणारी ट्रेन बसला धडक देईल की काय अशी भीती लोकांमध्ये होती. सुदैवाने इंटरलॉक असल्याकारणाने कोणताही अपघात झाला नाही आणि ट्रेन 300 मीटर आधीच उभी राहिली.

हे ही वाचा- VIDEO : कोरोना योद्ध्यांचा क्रूर चेहरा; विनामास्क दिसला म्हणून तरुणाला मारहाण सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र काही व्हिडीओ पाहताना हृदयाचा ठोका चुकतो. हा व्हिडीओ पाहतानाही अशीच परिस्थिती निर्माण होते. सुदैवाने ट्रेन आधीच थांबली असल्या कारणाने मोठा अपघात टळला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या