मुजफ्फरनगर, 02 मार्च : टीक टॉकची भुरळ सर्वांनाच लागली आहे. टीक टॉक करण्याचं वेड एवढं वाढत चाललं आहे की खाणं, झोप, काम सगळं सोडून फक्त टीक टॉकवर व्हिडीओ करण्याच्या मागे लागले आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओमध्ये तरुण आपला जीव धोक्यात घालून व्हिडीओ तयार करताना दिसत आहे. हा व्हिडीओ आपला शेवटचा ठरेल आणि आपल्याचं मृत्यूचा खेळ असा कॅमेऱ्यात कैद होईल याची पुसटशी कल्पनाही या तरुणाला नव्हती. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर इथे टीक टॉक व्हिडीओ तयार करताना तरुणाच्या मृत्यूचा लाईव्ह थरार कॅमेऱ्यात कैद झाला. तरुणानं पोहोण्यासाठी पाण्यात उडी मारल्यानंतर त्याचा मृतदेहच वर आल्यानं टीक टॉक व्हिडीओ तयार करणाराही गांगरुन गेला. ह्या दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हे वाचा- VIDEO : प्रशिक्षकाच्या प्रसंगावधानामुळे वाचली जिमनॅस्टिक करणारी मुलगी हा तरुणा 18 वर्षांच्या असल्याची माहिती मिळत आहे. ही घटना दोन-तीन दिवसांपूर्वीची असल्याचं सांगितलं जात आहे. या तरुणासोबत काही मित्रही तिथे उपस्थित होते. हा तरुण उंचावर पाण्यात उडी मारण्याचं धडस करणार होता. मात्र त्याला त्याचे मित्र नको करू म्हणून ओरडून सांगत होते. त्यातला एक मित्र व्हिडीओ काढत होता. मात्र कुणाचंही न ऐकता या तरुणानं एक पाऊल मागे जात सूर मारला. पाण्यात उडी मारल्यानंतर त्याचं डोकं दगडावर आदळलं असाव असं सांगितलं जात आहे. टिक टॉक स्टार होण्याऐवजी मृत्यू कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अंगावर काटा आणणारा मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हे वाचा- VIDEO : लय भारी! या तरुणाच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून तुम्हीही व्हाल थक्क