फोटो सौजन्य - Canva
लखनऊ, 05 ऑक्टोबर : एकिकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा गाजतो आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीही चर्चेत आले आहेत. यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ यांनी असं काही केलं की त्यांचीच चर्चा सर्वत्र होते आहे. मुख्यमंत्री योगी बिबट्याच्या पिल्लासोबत दिसले. त्यांनी बिबट्याच्या पिल्लासोबत जे केलं, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरच्या शहीद अशफकुल्ला खान प्राणीसंग्रहायल आणि हॉस्पिटलला भेट दिली. मुख्यमंत्र्यांना प्राणी खूप आवडतात. त्यांचं प्राण्यांवरील प्रेम इतकं आहे, ते किती तरी वेळा कित्येक प्राण्यांसोबत दिसले आहेत. त्यांचं प्राण्यांवरील प्रेम दर्शवणारा हा एक व्हिडीओ आहे. हे वाचा - हा गल्लीतला Cricket Video पाहून PM Modi सुद्धा झाले इम्प्रेस; असं काय आहे यात पाहा व्हिडीओत तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बिबट्याला आपल्या कुशीत घेतलं आहे. त्यानंतर दुसऱ्या हातात बाटली घेऊन ते त्या पिल्लाला दूध पाजत आहे.
Salaria_Shikha1 ट्विटर युझरने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. सीएम योगी यांचा हा व्हिडीओ अनेकांना आवडला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.