भोपाळ, 01 मार्च : अनेकदा आपण माणसं कुणामध्ये भांडणं झाली की ती सोडवायला जातो. पण बऱ्याच वेळा दोघांच्या भांडणात तिसऱ्याचे हाल होतात. भांडणारे बाजूला राहतात आणि त्यांच्यात मध्यस्थी करणारा फसतो. असंच घडलं आहे ते एका बिबट्यासोबत. दोन वाघिणींच्या लढाईत मध्यस्थी करणं एका बिबट्याला चांगलंच महागात पडलं आहे. तो असा लटकला की यापुढे कुणाच्याच लढाईत पडण्याची हिंमत तो करणार नाही (Tigress attacked on leopard). मध्य प्रदेशच्या बांधवगढ टाइगर रिझर्व्हमध्ये (Bandhavgarh Tiger Reserve) दोन वाघिणींची लढाई झाली. लढाई पाहून एका बिबट्याने अचानक हस्तक्षेप केला. कमजोर वाघिणचीच्या मदतीसाठी तो धावला. त्यावेळी गंभीररित्या जखमी झालेली वाघीण तिथून पळाली, त्यामुळे दुसरी वाघीण चवताळली. वाघिणीसोबतची लढाई सोडून तिने बिबट्यावरच हल्ला केला. बिबट्याने सुरुवातीला वाघिणीपासून दूर पळण्याचा प्रयत्न केला. पण वाघिणीने त्याचा पिच्छा सोडला नाही. ती त्याच्या खूपच जवळ होती, याची कल्पना येताच तो झाडावर चढला. वाघीण खाली बसून बिबट्याला रागात पाहत होती. @KashifKakvi नावाच्या ट्विटर अकाऊंटवर ही घटना सविस्तरपणे सांगण्यात आली आहे. हे वाचा - 2 वर्षांतच 219 किलोच्या महिलेने घटवलं 141 किलो वजन; 78 किलोची होताच भयंकर अवस्था सकाळी ८ च्या सुमाराच बिबट्या झाडावर चढला. तासाभराने तो वाघीण झोपली असं समजून झाडावरून खाली उतरला. जसा बिबट्या खाली आला तसं वाघिणीने त्याच्यावर उडी घेत हल्ला केला. वाघीण जवळ येणार तोच बिबट्या वेगाने पुन्हा दुसऱ्या झाडावर चढला. असं आणखी काही वेळा झालं. अशा पद्धतीने आपण काही वाचणार नाही हे बिबट्याला समजलं. त्यामुळे त्याने झाडाच्या एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडी मारायला सुरुवात केली. वाघीण जमिनीवर त्याचा पाठलाग करत राहिली.
दुपारी तीन वाजता अखेर वाघीण तिथून निघून गेली. काही मिनिटांनी थकलेला बिबट्या झाडावरून खाली आला आणि तिथून निघून गेला. तब्बल सात तास बिबट्याला त्याला झाडावर घालवावे लागले. हे वाचा - ओ तेरी! चक्क मोर - शेळी आपसात भिडले; कधीच पाहिला नसेल असा जबरदस्त FIGHTING VIDEO या लढाईनंतर जखमी झालेली वाघीण गायब झाली आहे, तिचा शोध सुरू करण्यात आला. दोन तासांनंतर ती वाघीण सापडली. तिला प्राथमिक उपचार देण्यात आले, अशी माहिती मिळते आहे.