JOIN US
मराठी बातम्या / Viral / ये लेका, कोल्हापुरात दोन गटात हातोडी-फावड्याने तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल

ये लेका, कोल्हापुरात दोन गटात हातोडी-फावड्याने तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल

या मारहाणीत सरपंच जयश्री भोईटे यांचे पती संभाजी यांना हातोडीने मारहाण करून जखमी करण्यात आले.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

राधानगरी, 12 जुलै : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं अतिक्रमण रोखण्यावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेत 3 जण जखमी झाले आहे. तुरंबे इथं गायरान हद्दीत गट क्रमांक 69 मध्ये रसूल बालेचांद बेगुलजी यांच्या घरासमोरील गायरान हद्दीत आरसीसीचे बांधकाम सुरू होते. याची माहिती ग्रामपंचायतीला मिळताच त्यांनी या भागात अतिक्रमण करू नये, अशी नोटीस बजावण्यात आली होती. पण नोटिसीकडे दुर्लक्ष करून बेगुलजी यांनी बांधकाम सुरूच ठेवले.

त्यानंतर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी बेगुलजी यांनी अतिक्रमण थांबवण्यास सांगितले असता दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. तिघे एटीएम सेंटरमध्ये घुसले, गॅस कटरने मशीन फोडून 14 लाख रुपये पळवले दोन्ही गटाने एकमेकांवर लाथा बुक्याने आणि हातोडा,  फावड्या मारहाण केली. या मारहाणीत सरपंच जयश्री भोईटे यांचे पती संभाजी यांना हातोडीने मारहाण करून जखमी करण्यात आले. भोईटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी परस्पराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. जखमी संभाजी भोईटे यांनी राधानगरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे तर अतिक्रमण करणारे बेगुलजी याने कोल्हापूर इथं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या