JOIN US
मराठी बातम्या / Viral / धक्का देत अंगावरून गेला ट्रक, पण महिलेला खरचटलंही नाही; कॅमेऱ्यात कैद झाला थरार, VIDEO

धक्का देत अंगावरून गेला ट्रक, पण महिलेला खरचटलंही नाही; कॅमेऱ्यात कैद झाला थरार, VIDEO

Road Accident Video: एका ट्रकने महिलेला पाठीमागून येत धक्का दिला. मात्र, सुदैवाने या घटनेत महिलेचा जीव वाचला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 22 डिसेंबर : आजच्या काळात रस्त्यावर गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे प्रदुषणासोबतच अपघातांचं (Road Accident) प्रमाणही वाढलं आहे. एका रिपोर्टनुसार, जगभरात दरवर्षी लाखो रस्ते अपघात होतात, ज्यात लोकांना आपला जीवही गमवावा लागतो. त्यामुळे ट्राफिकचा प्रत्येक नियम पाळण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून अपघातांचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल. मात्र, तरीही लोकांच्या हलगर्जीपणामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. यामुळे रस्त्यावरुन पायी चालत असतानाही लोकांनी आपल्या पाठीमागून किंवा समोरून येणाऱ्या गाड्यांवर लक्ष द्यायला हवं. जेणेकरून दुर्घटना टाळता येतील. चाकू हल्ल्यापासून संरक्षण करणार टी-शर्ट! शरिरावर होणार नाही जखम, असा खरेदी करा देव तारी त्याला कोण मारी ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. सध्या याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Shocking Accident Video Viral) होत आहे. यात दिसतं की एका ट्रकने महिलेला पाठीमागून येत धक्का दिला. मात्र, सुदैवाने या घटनेत महिलेचा जीव वाचला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की महिला काहीतरी सामान खरेदी करून चालली आहे. चालता चालता ही महिला रस्त्यावर येते. इतक्यात तिच्या मागून एक ट्रेक येताना दिसतो. हा ट्रक महिलेला धक्का देऊन आरामात पुढे निघून जातो, जणू काही घडलंच नाही.

संबंधित बातम्या

सुदैवाने ट्रकचा धक्का लागताच महिला ट्रकच्या दोन्ही चाकांच्या मध्ये पडते.. यामुळे घटनेत तिचा जीव वाचतो. मात्र तिच्या हातातील सामान ट्रकच्या चाकाखाली येतं. ही हैराण करणारी घटना नेमकी कुठली आहे, याबद्दल अद्याप समजू शकलं नाही. व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @CrazyFunnyVidzz नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत 7 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर शेकडो लोकांनी लाईक केला आहे.

पत्रकारांशी बोलत होत्या आरोग्यमंत्री, तेवढ्याच पायावर चढली ‘मकडी’; आणि मग…

काही लोकांनी व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत. यूजर्सनी ही महिला नशीबवान असल्याचं म्हटलं आहे. कारण या दुर्घटनेत तिचा जीव वाचला. अन्यथा ज्या पद्धतीने ट्रकने महिलेला धक्का दिला त्यानुसार महिलेची अवस्था गंभीर होण्याची शक्यता अधिक होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या