मुंबई, 03 मार्च: टिकटॉकवर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यावर लोक आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी निरनिराळी शक्कल लढवतात. अशाच एका टिकटॉक स्टारने भन्नाट व्हिडीओ बनवलाय.त्यानं या व्हिडीओमध्ये जगातल्या सर्वात श्रीमंत माणसाची संपत्ती चक्क टिकटॉकवर मोजली आहे. आपण विचार ही करू शकत नाही अशा पद्धतीनं या तरूणानं ही संपत्ती मोजली आहे. अॅमेझॉनचे मालक जेफ बेझोसची संपत्ती या टिकटॉक स्टारने तांदळाच्या दाण्यांनी मोजली आहे. त्याचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 32 वर्षाच्या या तरूणानं तांदळाच्या दाण्याचा वापर करत जेफ बेझोस यांची संपत्ती मोजली. टिकटॉक स्टार फॉलोअर्स वाढण्यासाठी काय करतील याचा काही नेम नाही. पण या तरूणाने तर चक्क जगातल्या सगळ्यातं श्रीमंत माणसाची 122 अरब डॉलरची संपत्तीच मोजली आहे. आता एवढी संपत्ती तांदळाच्या दाण्यांत मोजणं ही काय सोपी गोष्ट नाही. या तरूणानं तांदळ्याच्या दोन दाण्यांना एक लाख डॉलर मानलं आहे. तर दहा लाख डॉलर दाखवण्यासाठी त्यानं दहा तांदळाच्या दाण्यांचा वापर केला आहे. एक अरब डॉलर दाखवण्यासाठी त्यानं तब्बल 10 हजार तांदळाचे दाणे मोजले आहेत.
हा व्हिडीओ दोन पार्टमध्ये बनवला आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये त्याने दाणे मोजून जेफची संपत्ती मोजली आहे. तर दुसऱ्यामध्ये तांदळाच्या दाण्याचं त्यानं वजन केलं आहे. जेफ यांची संपूर्ण संपत्ती मोजण्यासाठी त्याला 27 किलो तांदूळ लागले आहेत. याशिवाय टिकटॉक व्हिडीओमध्ये त्याने घरची किंमत देखील तांदळाच्या दाण्यानं मोजली आहे. तरूणाच्या या टिकटॉक व्हिडीओला 5 लाख लोकांनी पाहिलं आहे.हा व्हिडीओ त्यानं ट्विटर पण शेअर केला आहे. ट्विटवर हा व्हिडीओ 2.8 मिलीयन लोकांनी पाहिलाय तर 30 हजार जणांनी तो शेअर केला आहे. या व्हिडीओ पाहून अनेकांनी या तरूणांच्या अनोख्या प्रयत्नाला सलाम केला आहे. हे वाचा : पाण्याच्या शोधात गच्चीवर आली माकडीण, पुढे काय घडलं पाहा VIDEO