नवी दिल्ली 23 डिसेंबर : घनदाट जंगलातून जाताना लोकांनी नेहमी सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण वेगवान वाहनांची धडक वन्य प्राण्यांसाठी घातक ठरू शकते. तसंच वन्य प्राणी आक्रमक होऊ शकतात, हे मानवांसाठी धोकादायक ठरू शकतं. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एका दुचाकीस्वारासमोर अचानक वाघ येऊन उभा राहतो. यानंतर जे काही घडतं ते तुम्ही स्वतः व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पाहू शकता. तरुणीचा खरा चेहरा समोर येताच, घोडा देखील घाबरला; व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक दुचाकीस्वार जंगली भागात असलेल्या रस्त्यावरुन जाताना दिसत आहे. पुढच्याच क्षणी एक वाघ त्याच्या अगदी जवळ येतो. हे पाहून दुचाकीस्वार चांगलाच घाबरतो. घाबरून ती व्यक्ती लगेचच आपली बाईक मागे घ्यायला लागतो. मात्र, वाघही काही अंतर पुढे येतो. यामुळे दुचाकीस्वार आणखीच घाबरतो. काही अंतरापर्यंत येऊन हा वाघ जागेवरच थांबतो. दुचाकीच्या मागे असलेल्या कारमध्ये बसलेल्या व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील कटरनियाघाट वन्यजीव अभयारण्यातील असल्याचा दावा अनेक वापरकर्त्यांनी केला आहे.
अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी लिहिलं आहे की, बाईकमध्ये बॅक गिअरसारखं काहीही नसतं. त्यामुळे डोक्याचा वापर करा. प्राण्यांच्या अधिवासात वाहनं हळू चालवा. बातमी देईपर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे, तर हजारो लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत. गेंड्याच्या बाळाला जन्म घेताना पाहिलंय? हा Video आश्चर्यचकीत करणारा एका यूजरने लिहिलं आहे की, ‘बहुतेक वाघाचं पोट भरलं आहे.’ कमेंट करत दुसऱ्या यूजरने लिहिलं की, ‘बाईकर ब्रेकफास्ट होण्यापासून बचावला.’ आणखी एकाने लिहिलं, ‘प्रत्येक वेळी नशीब साथ देत नाही.’ याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.