लंडन, 31 मे: शिकारी जानवर जंगलात किंवा पिंजऱ्यात कुठेही असला तरी तो शिकार कशी करायची हे विसरत नाही. त्याला संधी मिळाली तर पिंजऱ्यातही शिकार करण्याचा प्रयत्न करतो. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल (Viral) झाला आहे. यामध्ये एका वाघाने (Tiger) लहान मुलावर (Child) हल्ला केला, पण मुलाचा त्यामध्ये जीव वाचला. हे कसं झालं, ते तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता. ‘द सन’ या ब्रिटीश वृत्तपत्राने त्यांच्या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा उभा आहे. त्याच्या समोर कदाचित त्याचे आई-वडिल उभे आहेत. ते मुलाला काही तरी सांगत आहेत, त्यामुळे तो मुलगा भलताच आनंदी आहे. मुलाच्या मागे थोड्या अंतरावर असलेल्या वाघाला त्याची शिकार दिसते. शिकार पाहताच त्याच्यावर झडप घालण्यासाठी तो मुलाच्या दिशेने धाव घेतो. त्याचवेळी तो मुलगा मागे वळून त्या वाघाकडे पाहतो. वाघाला पाहून मुलगा खूश होतो. वाघ वेगानं मुलावर झडप घालण्याचा प्रयत्न करतो, पण थेट काचेवर आदळतो. वाघाचा तो हल्ला पाहून मुलगा घाबरतो आणि काचेपासून दूर होतो. पण मुलगा आणि वाघाच्यामध्ये काच असल्याने तो वाचतो.
ऐकावं ते नवलच! महिला पत्रकाराने सेक्स करताना घेतला इंटरव्ह्यू; कारण… वास्तविक हा व्हिडीओ एका पार्कमधला आहे. त्या पार्कमध्ये काचेच्या भींतीजवळ उभं राहून लोकं जनावरांना पाहू शकतात. हा चिमुरडा देखील त्याच्या कुटुंबीयांसोबत काचेच्या भींतीपाशी उभा होता. त्यावेळी मुलाला काचे जवळ उभं असलेलं पाहून वाघ काय करतो, आणि वाघानं हल्ला केल्यावर मुलगा काय करतो, हे त्याच्या आई-वडिलांना पाहयचं होतं, म्हणून त्यांनी थोडं लांब राहून हा व्हिडीओ शूट केला आहे.