JOIN US
मराठी बातम्या / Viral / दुकानात शिरून चोरी केली पण CCTV वर नजर पडताच करू लागला डान्स; हा मजेशीर VIDEO एकदा बघाच

दुकानात शिरून चोरी केली पण CCTV वर नजर पडताच करू लागला डान्स; हा मजेशीर VIDEO एकदा बघाच

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं, की चोर चोरी करण्यासाठी एका शॉपिंग स्टोरमध्ये शिरतो. यानंतर तो तिथे पडलेलं एक पॅकेट आपल्या टीशर्टमध्ये लपवतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 15 नोव्हेंबर : जगात दररोज हजारो -लाखो चोरीच्या आणि दरोड्याच्या घटना घडतात. मात्र काही चोर कॅमेऱ्यासमोरच असं कृत्य करताना दिसले आहेत जे पाहून कोणालाच हसू आवरत नाही. सोशल मीडियावर (Social Media) सध्या अशाच एका चोराचा व्हिडिओ व्हायरल (Funny Video of Theft) होत आहे. यात दिसतं की चोरी केल्यानंतर या चोराची नजर सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर पडते. हे पाहताच घाबरून तो तिथेच डान्स करू लागतो (Thieve Start Dancing After Seeing CCTV). वैज्ञानिकांना सापडला ‘प्रेग्नंट हिरा’; तोडताच आतमधील वस्तू पाहून झाले अवाक सोशल मीडियावर सतत मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ तर असे असतात जे पाहून डोळ्यांवर विश्वास बसत नाही. तर काही व्हिडिओ पोट धरून हसण्यास भाग पाडणारे असतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं, की चोर चोरी करण्यासाठी एका शॉपिंग स्टोरमध्ये शिरतो. यानंतर तो तिथे पडलेलं एक पॅकेट आपल्या टीशर्टमध्ये लपवतो. मात्र इतक्यात त्याची नजर समोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर पडते. यानंतर जे काही घडतं ते अतिशय मजेशीर आहे. कॅमेरा पाहताच हा तरुण अतिशय घाबरते. यानंतर तो काही वेळ तिथेच उभा राहतो. यानंतर डान्स करत चोरलेलं पॅकेट तो पुन्हा ठेवून देतो.

संबंधित बातम्या

व्हिडिओमध्ये हा चोर ज्या पद्धतीनं डान्स करत पॅकेट पुन्हा जागेवर ठेवतो, ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. हा व्हिडिओ हैराण करणारा तर आहेच मात्र सोबतच खळखळून हसवणाराही आहे. चोराचा अनोखा अंदाजा लोकांच्या पसंतीस उतरत आहे. विशेष बाब म्हणजे चोरानं जोपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरा पाहिला नव्हता तोपर्यंत तो अतिशय आरामात होता. मात्र कॅमेरा दिसताच आपण पकडलो जाऊ अशी भीती त्याला वाटू लागल्यानं अतिशय मजेशीर पद्धतीनं त्यानं ही वस्तू पुन्हा जागेवर ठेवली. हा व्हिडिओ पाहून नेटकरी खळखळून हसत आहेत. ऑनलाईन मीटिंगदरम्यानच व्यक्तीनं काढले आपले कपडे अन्…; विचित्र घटनेचा VIDEO 16 सेकंदाचा हा व्हिडिओ tyrese नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. एक दिवसाआधी शेअर झालेला हा व्हिडिओ 6 लाख 58 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. ही संख्या वाढतच आहे. अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या