JOIN US
मराठी बातम्या / Viral / मंदिरात चक्क देवीच्या मूर्तीसमोर चोरी; टोळीने सर्वांसमोर साधला डाव, पाहा हैराण करणारा VIDEO

मंदिरात चक्क देवीच्या मूर्तीसमोर चोरी; टोळीने सर्वांसमोर साधला डाव, पाहा हैराण करणारा VIDEO

नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने देवीच्या दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी होती. दरम्यान हा सर्व प्रकार मंदिरातील CCTV मध्ये कैद झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मध्य प्रदेश, 15 ऑक्टोबर : नवरात्रौत्सवात (Navratra) मोठ्या संख्येने भक्तगण देवाच्या दर्शनासाठी मंदिरात जातात. दरम्यान कोरोना काळात चोरी, दरोड्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. नवरात्रौत्सवातही मोठ्या संख्येने भक्तगण देवीच्या दर्शनासाठी मंदिरात जात आहेत. अशा महिलांना निशाणा बनवला जात असल्याचं या व्हिडीओमधून (Video Viral) दिसून येत आहे. उज्जेन फ्रीगंज क्षेत्र सुंदर डेरीजवळ राहणाऱ्या मीना देवी रविवारी गड कालिका माता मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. यादरम्यान गर्दी अधिक असल्या कारणाने त्या रांगेत होत्या आणि देवीच्या दर्शानासाठी वाट पाहत होत्या. दर्शनाच्या रांगेत असताना महिलेसोबत धक्कादायक (Theft in Temple) प्रकार घडला. अगदी देवीच्या मूर्तीसमोर हे सर्व घडलं. मीना देवी यांच्या मागे उभी असलेल्या चोरी गँगने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरली. आणि महिलेला याबद्दल काहीच कळलं देखील नाही. या चोर महिलांनी मीना देवी यांच्या गळ्यातील चैन तोंडाने तोडली. (Theft in front of the idol of the goddess in the temple The gang made a move in front of everyone watch VIDEO) हे ही वाचा- अल्पवयीन मुलीवर बापासह 28 जणांचां बलात्कार; आईनेही सांगितला थरकाप उडवणारा प्रकार सुरुवातील या महिलेने मीना देवी यांच्या गळ्यातील चैन हाताने तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही चैन तुटत नसल्याचं पाहून या चोर महिलेने स्वत:च्या तोंडाने चैन तोडली.

इतक्या गर्दीत महिलेने समोरच्या महिलेच्या गळ्यातील चैन चोरली. सोन्याची चैन चोरण्याचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आता या फुटेजच्या आधारावर महिलेचा शोध सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या