हिसार, 24 जुलै : हरियाणातील हिसार या भागातून एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. येथील नागरिक आपल्या नातेवाईकांना रात्री उशिरा रुग्णालयात घेऊन पोहोचले. मात्र बराच वेळ कोणताच डॉक्टर तपासण्यासाठी पुढे आला नाही. बराच वेळ या तरुणीने डॉक्टरांबद्दल विचारणा केली. मात्र कोणीच आलं नाही. शेवटी आपात्कालीन विभागाजवळ एका खोलीत डॉक्टर आणि दुसरी एक व्यक्ती झोपलेले असल्याचं दिसलं. तरुणीने हा सगळा घटनाक्रम आपल्या मोबाइलमध्ये शूट केला. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तरुणी ज्या व्यक्तीसोबत बोलत आहे, तो ड्यूटीवर आराम करीत आहे. तर दुसरीकडे एक व्यक्ती बेडवर अंगावर पांघरून झोपली आहे.
यानंतर तरुणी आणि डॉक्टरांमध्ये वाद होता. ड्यूटीवर असताना तुम्ही कसे काय झोपता, असा सवाल तरुणी डॉक्टरांना करीत आहे. त्यानंतर रागाच्या भरात डॉक्टर ओपीडी रुममध्ये आपल्या खुर्जीवर जाऊन बसतो. हे ही वाचा- जुगाडाय तस्मै नम: ! बसेल धक्का, येईल हसू; पाहा Video येथे तरुणी डॉक्टरचा व्हिडीओ अनिल विज याला पाठविण्याची धमकी देते. ज्यानंतर डॉक्टर तरुणीचा मोबाइल खेचून घेतो. यानंतर तरुणी डॉक्टरला फोन परत देण्यास सांगते. मात्र तो फोन देण्यास नकार देतो. यानंतर फोन खेचाखेचीमध्ये तरुणी डॉक्टरच्या कानशिलात लगावते. डॉक्टरचं हे कृत्य मोबाइलमध्ये कैद झालं आहे. डॉक्टरांनी साथी कर्मचाऱ्यांसह ओपीडीचा बहिष्कार करीत तरुणीवर गुन्हा दाखल करण्याचा दबाव आणला आहे. ज्यानंतर पोलिसांनी तरुणी आणि सोबत आलेल्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.