JOIN US
मराठी बातम्या / Viral / अख्खं गाव फक्त पाहत होतं, आणि 'ती' पतीचा मृतदेह हातगाडीवर ओढत नेत होती!

अख्खं गाव फक्त पाहत होतं, आणि 'ती' पतीचा मृतदेह हातगाडीवर ओढत नेत होती!

शेवटी डोळे पुसून सदाशिव यांच्या पत्नीने मनाशी निर्धार केला आणि आपल्या पतीचा मृतदेह कापडात गुंडाळला. त्यानंतर जाऊन एक हातगाडी आणली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कर्नाटक, 18 जुलै : कोरोनामुळे माणुसकी केव्हाच मेली आहे. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी चार जण लागतात पण चार लोकं देखील कोरोनाच्या दहशतीमुळे पुढे येईना झाले आहे. कर्नाटक येथील अथणी गावात पतीच्या मृतदेहाला हात लावण्यासाठी कुणी पुढे आलं नाही, त्यामुळे पत्नीनेच हातगाडीवर पतीचा मृतदेह टाकून स्मशानभूमीत नेल्याचा मन्न सुन करणारा व्हिडिओ समोर आला आहे. अथणी येथील सदाशिव हिरट्टी (55) याचा रात्री मृत्यू झाला होता. सदाशिव मृत झाल्याची घटना शेजारी, नातेवाईक यांना समजली. त्यानंतर शेजारी आणि नातेवाईक हिरट्टी यांच्या घरी पोहोचले. पण, घरात कुणीली प्रवेश करायला तयार नव्हते. सदाशिव हिरट्टी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असेल म्हणून सगळ्यांनी दुरून अंत्यदर्शन घेतले आणि निघून गेले. पण घरात सदाशिव यांचा मृतदेह तिथेच राहिला. पतीच्या मृत्यूमुळे आक्रोश करणाऱ्या त्यांच्या पत्नीला या प्रकारामुळे काय करावे काही सुचेना. त्यांनी लोकांना विनवणी केली, पण कुणीही पुढे येण्यास तयार नव्हते.

संबंधित बातम्या

शेवटी डोळे पुसून सदाशिव यांच्या पत्नीने मनाशी निर्धार केला आणि आपल्या पतीचा मृतदेह कापडात गुंडाळला. त्यानंतर जाऊन एक हातगाडी आणली आणि हातगाडीवर त्या दुःखी पत्नीने मृतदेह उचलून ठेवला. मी खासदार विनायक राऊतांचा मुलगा, बघून घेतो तुला? निलेश राणेंनी व्हिडिओ आणला समोर नंतर गावातील रस्त्यावरून हातगाडी घेऊन पत्नीने स्मशानात मृतदेह नेला. सगळे बघत राहिले पण एकही त्या पती गमावलेल्या महिलेच्या मदतीला कोणीही आलं नाही. शेवटी स्मशानात देखील पत्नीनेच पतीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. मन्न सुन करणारा हा व्हिडिओ समोर आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या