गुजरात : मोबाइल संदर्भातील अनेक दुर्घटनांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. अनेकदा स्वस्त किमतीत घेतलेल्या तर कधी कधी तर चांगल्या कंपनीच्या फोनचा ब्लास्ट झाल्याच्या अनेक घटना वारंवार समोर येत आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ एका दुकानातील असून सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हा व्हिडीओ (Video) गुजरातमधील (Gujrat News) पाटण जिल्ह्यातील आहे. पाटण जिल्ह्यातील राधनपूर भागात एक व्यक्ती आपल्या ओळखीच्या व्यक्तीच्या दुकानात गप्पा मारीत बसला होता. त्याने शर्टाच्या खिशात मोबाइल ठेवला होता. अचानक मोबाइलमधून (Mobile Fire) धूर येऊ लागला. यानंतर तातडीने त्या व्यक्तीने मोबाइल खाली फेकला. यानंतरही मोबाइलमधून धूर येतच होता. शेवटी थोड्या वेळानंतर मोबाइल पूर्णपणे जळाल्याचं सांगितलं जात आहे. हे ही वाचा- तुमचं WhatsApp आपोआप लॉगआउट झालं का? जाणून घ्या यामागचं कारण
ग्लास्गो येथे राहणाऱ्या एंड्रू ग्रेंजर (Andrew Granger) नावाच्या व्यक्तीने सॅमसंग गॅलेक्सी A02 (Samsung Galaxy A02) फोन खरेदी केला होता. एंड्रूने शहरातील एका इंटरनॅशनल फोन सेंटरमधून हा फोन खरेदी केला होता. डेली रिपोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, त्याने त्याच ठिकाणी त्याचा जुना फोनही चेंज केला होता. पण नवा फोन खरेदी केल्यानंतर अगदी काही दिवसांतच त्याचा फोन सतत गरम होऊ लागला. पण फोनमुळे अशाप्रकारे भयंकर अपघात होईल याची त्याने जराही कल्पना केली नव्हती. 5 वर्षीय एंड्रू घरातच असताना हा अपघात झाला. त्याने फोन हातात पकडला असताना त्याला हाताला भाजल्यासारखं जाणवलं. काही वेळाने हात जळत असल्याचं त्याला वाटलं. तिथेच फोनमध्ये आग लागण्यास सुरुवात झाली होती. हाताला अतिशय भाजल्यासारखं झाल्याने त्याने फोन जमिनीवर फेकला. फोन जमिनीवर टाकल्या टाकल्या जोरदार स्फोट झाला. या स्फोटामुळे फोनमधून ठिणगी उडाली आणि त्या एवढ्याच्या ठिणगीने संपूर्ण घरात पेट घेतला.