JOIN US
मराठी बातम्या / Viral / तुम्हाला तरी माहिती आहे का? कोरोनाचा इतिहास, वर्तमान सांगतेय ही चिमुरडी; VIDEO पाहून तोंडात बोटं घालाल!

तुम्हाला तरी माहिती आहे का? कोरोनाचा इतिहास, वर्तमान सांगतेय ही चिमुरडी; VIDEO पाहून तोंडात बोटं घालाल!

चिमुरडीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ शेअर होत असतात, मात्र त्यातील काही व्हिडीओ अधिक पाहिले जातात. अशा व्हिडीओंमधील वेगळेपण लोकांना अधिक भावतं. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुरडी कोरोनाचा इतिहास, वर्तमानकाळ आपल्या शब्दात सांगतेय. कोरोना कुठून आला, त्याला कसं रोखता आलं असतं असं बरंच काही ती या व्हिडीओमध्ये सांगत आहे. (Facebook Viral Video) प्रेक्षक या चिमुरडीचं कौतुक करीत आहे. अत्यंत आत्मविश्वासाने ती कोरोना हा चीनमधून आल्याचं सांगते. आणि जर चीनने कोरोना विषाणूबद्दल इतर देशांना इशारा दिला असता तर कोरोनाचा प्रसार रोखता आला असता असं ती चिमुरडी म्हणतेय. अवघ्या 2.27 मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये चिमुरडी हावभाव आणि चेहऱ्यावर अभिनय करीत कोरोनाबद्दल तिला असलेली माहिती सांगत आहे. हे ही वाचा- VIDEO: नवरीच्या नातेवाईकानं लग्नात केली मस्करी, नवरदेवानं भरमंडपात केली धुलाई

हवा येऊ द्या नावाच्या एका फेसबुक पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ हजारो वेळा पाहिला गेला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे की, दीदीला तर आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओत तरुण वृत्त वाहिन्यांचाही संदर्भ देते. लहान वयात जेथे कार्टून पाहण्यात मुलं वेळ घालवत असतात. तेथे ही तरुण आजोबांनी लावलेल्या बातम्या लक्षपूर्वक पाहत असल्याचं दिसतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या