नवी दिल्ली, 9 मार्च : घर भाड्याने देणं आणि नंतर व्यवस्थितपणे घर मिळवणं प्रत्येकाच्या नशीबात नसते. आणि प्रत्येक व्यक्ती मिळालेलं चांगलं घर तसंच परत करेल याचीही गॅरेंटी कोणी देऊ शकत नाही. भाड्याने राहणाऱ्या एका व्यक्तीने असा काही कारनामा केला आणि घर मालकाला थेट पोलीस बोलवावी लागली. केंडल, कुम्ब्रिया (Kendal, Cumbria) मधील आपल्या घरी येण्यासाठी फिलचांगल महिन्यांपासून प्रयत्न करीत होते. मात्र त्यांचा भाडेकरू घर रिकामं करीतच नव्हता. घरमालक फिलला (Landlord Phil Tewkesley) यांना त्यांच्याच घरी येण्यासाठी वारंवार काही तरी कारण सांगून नकार देत होता. शेवटी फिलने घराच्या खोट्या किल्ल्या तयार केल्या आणि थेट घरात शिरला. घराची हालत पाहून त्याला धक्काच बसला. घराची कचरा कुंडी केली होतं. (house had now become a garbage dump) जेथे घाणच नाही तर जीव-जंतूदेखील दिसत होते.
फिल जेव्हा आपल्या पार्टनरसह घरात दाखल झाला तर तेथे तीळ ठेवण्यासाठीही जागा नव्हती. सर्वत्र घाण, कचरा आणि दुर्गंधी होती. सामानासह सर्वत्र कचरा पसरला होता. अख्खं घर फिरल्यानंतर लक्षात आलं की, आता हे घर राहण्या लायक राहिलं नव्हतं. त्यांनी आपल्या काही मित्रांना बोलावून साफसफाई सुरू केली. तब्बल 50 तासांच्या मेहनतीनंतर घरातील कचरा हटवण्यात आला. मात्र त्याच वेळी एक भयावह जीव पाहून सर्वांना धक्काच बसला. एका टँकमध्ये साप होता. यातील एक मृत होता. तर जमिनीवर विंचूही फिरत होता. (There was a snake in a tank, one alive and one dead. There was a scorpion crawling on the floor). जे पाहून तेथे हजर असलेल्या प्रत्येकाच्या पायाखालची जमीन सरकली. हे ही वाचा-
ऑन कॅमेरा फक्त खाऊन महिन्यालाच 7 कोटी कमावते; असं काय आहे हिच्या VIDEOमध्ये पाहा
कोरोनाचं कारण सांगून घरात येण्यापासून रोखत होता… परदेशात राहणाऱ्या फिलने कोरोनानंतर आता UK ला परतण्याची तयारी सुरू केली होती. त्यामुळे भाडेकरूला त्याने घर रिकामं करण्यास सांगितलं. मात्र जेव्हा कधी तो भाडेकरूला घर रिकामं करण्यास सांगे, तो काहीतरी कारण सांगत असे. अनेकदा तर कोरोनाचं कारण सांगून घर मालकालाच तो घरात येण्यापासून रोखत होता. शेवटी घरमालकाने धाड टाकली आणि तेथील प्रकार पाहूण त्याला धक्काच बसला. यानंतर फिल कधीच कोणाला घर भाड्याने देणार नसल्याचं म्हणतो.