Viral Video
मुंबई 18 ऑक्टोबर : सध्या ऑनलाईन फूड डिलिव्हरीचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता ऑफिस असू देत किंवा घर लोक बऱ्याचदा काही ना काही ऑर्डर करत असतात. आपल्याला अगदी रात्री देखील भूक लागली असू देत आपल्याला घरापर्यंत जेवण मिळतं. हे सगळं शक्य आहे ते झोमॅटो आणि स्विगी सारख्या फूड डिलिव्हरी कंपन्यांमुळेच. या कंपनीमध्ये काम करताने रायडर आपल्यापर्यंत पाऊस, पाणी आणि ट्राफिकमधून रस्ता काढत जेवण पोहोचवतात. म्हणूनच ते आपल्यासाठी हिरो असतात. खरंतर स्विगी देखील आपल्या डिलिवरी बॉय यांना नेहमीच हिरो म्हणतात. पण आज एक व्हिडीओ सोशल मीडिया वर ट्रेंड होत आहे. जो खरंच लाखो लोकांचं मन जिंकत आहे. स्विगी डिलिवरी बॉयचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो ट्रॅफिक पोलिसाची भूमिका साकारत आहे. खरंतर 30 मिनिटांपासून असलेली वाहतूक कोंडी या डिलिवरी बॉयने दूर केली, ज्यामुळे लोकांना सुटकेचा निश्वास सोडता आला. सोशल मीडिया वापरकर्ता श्रीजीत नायरने लिंक्डइनवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिलं की “मी ३० मिनिटांपेक्षा जास्त काळ ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो, आणि अचानक मला ट्रॅफिक हलताना दिसले. मला थोडं चांगलं वाटलं. मग मी पुढे गेल्यावर मी ट्रॅफिक कशी हलू लागली ते पाहिले. तेव्हा मला स्विगीचे एक विधान आठवले ‘डिलिवरी हिरो’ आणि आता मला समजले की #swiggy या लोकांना हिरो का म्हणतात; याच्या दैनंदिन कामाच्या व्यतिरिक्त, तो असं देखील करत आहे, जो आपल्याला त्रासमुक्त जीवन जगण्यास मदत करतो. या हिरालो सलाम!” हा व्हिडीओ कुठे शूट करण्यात आला आहे हे कळू शकलेलं नाही.
श्रीजीत नायरने काही दिवसांपूर्वी हा व्हिडिओ शेअर केला होता आणि तेव्हापासून त्याला लाईक्स आणि अनेक कमेंट्स मिळाल्या आहेत. तसेच लोकांनी या डिलिव्हरी बॉयचे कौतुक केलं आहे. या पोस्टला स्विगीने देखील उत्तर दिलं आहे आणि त्यानी लिहिले, “सर्व हिरो टोपी घालत नाहीत, काही स्विगी जॅकेट घालतात!”
दुसर्या युजरने म्हटले की, “खरं तर हे स्विगीमुळे नाही. समाजाप्रती त्याची वैयक्तिक बांधिलकी म्हणून या व्यक्तीने मदत केली. खरंतर त्याच्या पालकांनी दिलेले ते संस्कार आहेत. #swiggy श्रेय घेण्याऐवजी तुम्हाला ते स्वीकारावं लागेल.” सोशल मीडियावर तर हे सगळे डिबेट सुरुच राहाणार. पण खरंच काही शहरांमध्ये ट्राफिक खूप मोठी समस्या बनली आहे. ज्यामुळे अनेकांचा वेळ हा ट्राफिकमध्येच जातो. तसेच पैसा देखील वाया जातो. ज्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी आणि लक्षात घेतली. तर कदाचित कोणालाही याला सामोरं जावं लागणार नाही.