JOIN US
मराठी बातम्या / Viral / तलावात अंघोळ करताना हंसाने केला भयंकर हल्ला; बॉलिवूड अभिनेत्याने शेअर केला VIDEO

तलावात अंघोळ करताना हंसाने केला भयंकर हल्ला; बॉलिवूड अभिनेत्याने शेअर केला VIDEO

अभिनेत्याने शेअर केलेला हंसाच्या हल्ल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08 जून : पाण्यात मगरीने, शार्कने हल्ला केल्याच्या घटना आपल्यासाठी नव्या नाहीत. पण सध्या सोशल मीडियावर असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात कोणत्याच खरतनाक प्राण्याने हल्ला केला नाही आहे. तर चक्क एका हंसाने हल्ला केला आहे. तलावात अंघोळीसाठी गेलेल्या व्यक्तीवर एका हंंसाने भयंकर हल्ला केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे (Swan attack on man). हंस जे सामान्यपणे प्रेमासाठी ओळखले जातात. अशा प्रेमळ हंसाला तुम्ही कधी आक्रमक झालेलं पाहिलं आहे का?. अशाच आक्रमक हंसाचा हा व्हिडीओ आहे. ज्याने पाण्यात अंघोळ करणाऱ्या एका व्यक्तीवर हल्ला केला. हंसाच्या हल्ल्याचा हा व्हिडीओ अभिनेता शक्ती कपूर यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती तलावात अंघोळ करताना दिसते आहे. आपल्यासोबत पुढे काय घडणार आहे, याचा अंदाज या व्यक्तीला बिलकुल नव्हता. या तलावात कोणतीही मगर किंवा खतरनाक मासा नव्हता पण तरी या व्यक्तीवर हल्ला झाला. हा हल्ला केला तो एका हंसाने. हे वाचा -  पक्षी कसा उडतो पाहण्यासाठी पक्ष्यासोबतच आकाशात उडाली व्यक्ती; पुढे काय घडलं पाहा VIDEO ज्या तलावात ही व्यक्ती उतरली त्याच तलावात दोन हंस आहेत. या व्यक्तीला पाहताच दोघांपैकी एक हंस आपल्या पार्टनरला सोडून या व्यक्तीच्या जवळ येतं. सुरुवातीला ते शांत वाटतं पण व्यक्तीच्या जवळ येताच आक्रमक होतं. जशी ती व्यक्ती पाण्यातून आपलं डोकं बाहेर काढते तसा हा हंस त्याच्यावर चोच मारतो. हंसाने असा अचानक हल्ला केल्याने ही व्यक्तीही घाबरली. भीतीने ती पुन्हा पाण्यात गेली. थोड्या वेळाने ती जशी पाण्याबाहेर आली तसं या हंसाने तिच्यावर पुन्हा अटॅक केला.

संबंधित बातम्या

हंस इतका संतप्त का झाला, हे कळायला काहीच मार्ग नाहीच. कुणालाच त्याचं कारण समजलं नाही. पाण्यातून बाहेर पडण्यासाठी या व्यक्तीला बरीच मेहनत करावी लागली. तोपर्यंत हंसाने चोचीने त्याच्यावर बरेच वार केले होते. हे वाचा -  छोट्याशा उंदराने मांजरीला जीव नकोसा करून सोडलं; रिअल लाइफ Tom and Jerry Video एकदा पाहाच शक्ती कपूर यांनी हा व्हिडीओ शेअर करताना लाफ बाबा लाफ असं कॅप्शन दिलं आहे. व्हिडीओवर बऱ्यच मजेशीर कमेंट्स येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या