स्टंट व्हिडीओ
मुंबई १५ नोव्हेंबर : सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच मनोरंजक व्हिडीओ पाहायला मिळतात. तसेच येथे आपल्याला स्टंटशी संबंधीत अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. लोक सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी असे काही स्टंट करु लागतात की ते आपल्या जीवची देखील पर्वा करत नाहीत. अशा स्टंटमध्ये अनेकांनी आपले प्राण गमवल्याचे समोर आले आहे, तर अनेक लोक गंभीर जखमी देखील झाले आहेत. परंतु असं असलं तरी देखील लोक अशा स्टंटबाजी करताना जराही विचार करत नाहीत. हे ही वाचा : Video : सायकल चालवणाऱ्या चिमुकलीवरुन गेली कार… पुढे जे घडलं त्यावर विश्वास ठेवणं कठीण अशाच एका स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहताना तुम्ही तुमचा श्वास रोखून पाहाल, पण या तरुणाला मात्र त्याचं काहीच नाही. या व्हायरल व्हिडीओमध्ये तरुण स्टंटबाजी करत आहे. त्याचे स्टंट पाहून तुमच्या लक्षात येईल की त्याचा हा स्टंट साधा नाही तर तो इतका धोकादायक आहे की सेकंदाचा फरक जरी झाला तरी त्या व्यक्तीचा खेळ संपू शकतो.
या व्हिडीओत हा व्यक्ती गाड्यांवरुन उड्या मारताना दिसत आहे. त्यावेळी तो अपघात चुकवून एका गाडीवरुन दुसऱ्या गाडीवर तसेच, वेगवेगळ्या ऑब्स्टॅकल्सवरुन उडी मार आहे. पण विचार करा की जर थोडं जरी इकडे तिकडं झालं तर काय होईल? नशीबाने या तरुणासोबत काहीही वाईट झालं नाही, पण हे असं स्टंट करणं फारच धोकादायक आहे. हा व्हिडीओ Harsh Goenka यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी देखील भरभरुन कमेंट्स आणि लाईक केलं आहे.
या व्हिडीओला तुम्ही देखील मनोरंजन म्हणून पाहा, पण अशी स्टंटबाजी करु नका, जीवाशी असा खेळ नकोच.