JOIN US
मराठी बातम्या / Viral / शालेय विद्यार्थ्याने लिहिलं असं Leave Application; वाचून पोट दुखेल पण हसू आवरणार नाही

शालेय विद्यार्थ्याने लिहिलं असं Leave Application; वाचून पोट दुखेल पण हसू आवरणार नाही

एका शालेय विद्यार्थ्याचा सुट्टीचा अर्ज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ, 07 नोव्हेंबर : शाळेत सुट्टी हवी तर एक सुट्टीचा अर्ज द्यायला लागतो हे तुम्हाला माहितीच असेल. हा सुट्टीचा अर्ज लिहिणंही म्हणजेही एक कौशल्यच. अशाच एका शालेय विद्यार्थ्याचा सुट्टीचा अर्ज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो वाचून तुम्हाला बिलकुल हसू आवरणार नाही. सोशल मीडियावर या फनी लिव्ह अॅप्लिकेशनचीच चर्चा होते आहे. एका विद्यार्थ्याला बरं नाही आहे. त्यामुळे त्याने आपल्या शाळेच्या शिक्षकांकडे सुट्टीसाठी एक अर्ज दिला आहे. आयएएस अधिकारी अर्पित वर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा अर्ज पोस्ट केला आहे.  हा अर्ज वाचल्यानंतर त्याच्या शिक्षकांनीही त्याला तातडीने सुट्टी मंजूर केली असावी. असंच तुम्हीही म्हणाल. असं या विद्यार्थ्याने या अर्जात काय लिहिलं आहे ते पाहुया. हे वाचा -  Fact About Tip : रेस्टॉरंटमध्ये TIP का देतात, याची सुरूवात केव्हा पासून झाली? बुंदेलखंडी बोलीत खूप मजेशीर असा हा अर्ज आहे.  या सुट्टीच्या अर्जात म्हटलं आहे. आदरणीय मुख्याध्यापक, माध्यमिक पाठशाळा बुंदेलखंड. मास्तर…दोन ते चार दिवस मी शाळेत येणार नाही आहे. मला ताप आला आहे, नाकही वाहत आहे. त्यामुळे मी शाळेत येऊ शकत नाही. तुम्हाला विनंती आहे की मला मला दोन-चार दिवसांची सुट्टी दिली तर बरं होईल. मी नाही आल्याने तुमची शाळा कुठे बंद होणार आहे. तुमचा…आज्ञाधारी विद्यार्थी…कलुआ. याआधीही अशाच एका विद्यार्थ्याच्या रजेचा अर्ज व्हायरल झाला होता. ज्यात त्याने माझं निधन झालं आहे, मला अर्ध्या दिवसाची सुट्टी हवी, असं म्हटलं होतं. आश्चर्य म्हणजे प्राध्यापकानेही त्याला सुट्टी मंजूर केली होती. आता सुट्टीच्या या अर्जाने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

संबंधित बातम्या

आयएएस ऑफिसर अर्पित वर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा अर्ज पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर सुट्टीचा हा अर्ज अनेकांना आवडला आहे. त्यावर बऱ्याच मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. हे वाचा -  हॅलोवीनचा प्रॅंक समजून मुलीच्या ओरडण्याकडे आईचं दुर्लक्ष; खरी गोष्ट लक्षात येताच बसला धक्का तुम्हाला हा अर्ज कसा वाटला किंवा हा अर्ज वाचून तुम्हाला काय वाटलं, कशाची आठवण झाली? किंवा तुमच्या, तुमच्या मित्रमैत्रिणींच्या सुट्टीच्या अर्जाचा असा मजेशीर किस्सा असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या